Aurangabad News: मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) केला जाणार विसर्ग आणखी कमी करण्यात आला असून, उघडण्यात आलेल्या 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून धरणातील 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्रा आता फक्त आठच दरवाजे सुरु ठेवण्यात आले आहे. तर धरणातून सद्या एकूण 5 हजार 781 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 25 जुलैला जायकवाडी धरणातील 10 ते 27 अशा एकूण 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात सुद्धा आला होता. मात्र पाण्याची वरील आवक कमी झाल्याने विसर्ग सुद्धा कमी करण्यात आला. तर आता आवक मोठ्याप्रमाणावर कमी झाली असल्याने 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आले आहे. ज्यात द्वार क्र. 10, 27, 18, 19, 16,21, 14, 23, 12 व 25 चा समावेश आहे. बंद करण्यात आलेल्या या दहा दरवाज्यातून 0.5 फुट उंचीवरून पाणी सोडण्यात येते होते. मात्र दरवाजे बंद करण्यात आल्याने त्यातून होणार विसर्ग सुद्धा बंद झाला आहे.
उरलेल्या आठ दरवाज्यातून सद्या 4 हजार 192 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे दोन्ही मिळवून जायकवाडी धरणातून सद्या एकूण 5 हजार 781 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर पाण्याची आवक आणखी कमी झाल्यास सुरु असलेले आठही दरवाजे सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पाणी प्रश्न मिटला...
दुष्काळवाडा म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यावर्षी सुद्धा जुलै महिन्यातच विभागात अतिवृष्टी पाहायला मिळाली. त्यामुळे विहिरी, छोटे-मोठे तलाव आणि धरणातील पाणीसाठा वाढला आहे. तर जामिनाच्या पाणीपातळीत सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.