Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) झाल्टा शिवारातील एका हॉटेल मालकावर (Hotel Owner) केला जिवघेणा हल्ला (Attack) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बिल देण्यावरून आधी दोन मद्यपींनी वेटर व हॉटेल मालकांसोबत भांडण केले. त्यानंतर 14 जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकांसह त्याच्या काकांवर चाकू, स्टंप, बॅट, रॉडने जीवघेणा हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले. हा प्रकार झाल्टा शिवारातील हॉटेल आकाश परमिट रूम व बारवर घडला आहे. तर या प्रकरणी चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रामेश्वर शिंदे आणि छत्रपती रामचंद्र शिंदे (दोघे रा. झाल्टा, ता. औरंगाबाद) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाल्टा शिवारातील गट क्र. 54 मध्ये सागर शिंदे यांचे हॉटेल आकाश बिअर बार नावाने हॉटेल आहे. आकाश यांच्यासह त्यांचे वडील देखील हॉटेल चालवितात. दरम्यान 8 जानेवारीला दुपारी दोन वाजता सागर घरी गेला होता. तेव्हा त्याचे वडील रामेश्वर, वेटर अजयसिंग गुलाबसिंग चव्हाण आणि गावातील विलास शिंदे हे तिघे हॉटेलवर होते. मात्र अंदाजे अडीच वाजता वेटर चव्हाणचा सागर यांना फोन आला. हॉटेलमध्ये दोघे अनोळखी दारू पिलेले असून, बिलावरून भांडत असल्याचे सांगितले. त्यानंतर सागर तत्काळ हॉटेलमध्ये गेला. त्यानंतरही त्या मद्यपींनी बिअरच्या बाटल्या टेबलवर फोडून बिल देणार नाही, असे म्हणत गोंधळ घातला. खाल्ल्यापिल्यानंतर बिल देण्याची वेळ येताच या मद्यपींनी राडा घातला होता.
अचानक आलेल्या टोळक्याने केली मारहाण...
सागरने मध्यस्थी करत त्यांची समजूत घातल्यावर ते तेथून निघून गेले. पण काही वेळातच वेगवेगळ्या दुचाकीवरून तब्बल 14 जणांचे टोळके हॉटेलवर आले. त्यांच्याकडे लाकडी दांडे, बॅट, स्टंप, लोखंडी रॉड व चाकू होते. त्यांनी आधी बाहेरील चारचाकी व दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर हॉटेलमध्ये घुसून सागर शिंदे व त्याचे चुलते छत्रपती शिंदे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. सागरच्या छातीत व दंडावर चाकूने वार केले. छत्रपती शिंदे यांच्या कमेरजवळ चाकू खुपसला, ज्यात ते जखमी झाले. त्यानंतर हे टोळकं तेथून निघून गेले.
याबाबत माहिती मिळताच चिखलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: