Aurangabad Corona Update: चीनसह (China) जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पाहायला मिळत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा एकदा लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) राबवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आली आहेत. मात्र असे असतांना देखील औरंगाबाद शहरात (Aurangabad City) गेल्या 10 दिवसांपासून लसीकरण मोहीम पूर्णपणे बंद आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) लसींची मागणी केल्यावर 'जेव्हा लस उपलब्ध होतील, तेव्हा पाठवण्यात येतील,' असे पत्र शासनाने महानगरपालिकेला पाठवले आहे. 


जगभरात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यानुसार महापालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले. सोबतच पुन्हा एकदा शहरात लसीकरण मोहीम राबवण्याबाबत देखील सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र असे असतानाच शहरात मागील दहा दिवसांपासून कोरोना लसीकरण बंद आहे. मनपाकडे लसींचा साठाच उपलब्ध नाही. मनपाने वारंवार मागणी केल्यानंतरही शासनाकडून प्रतिसाद मिळायला तयार नाही. दरम्यान, शहरातील दोनच खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध असून, नागरिकांना पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे.दरम्यान कोविशिल्डच्या 50 हजार, कोवेंक्सिनच्या 15 हजार आणि कार्बोव्हॅक्सच्या 10 हजार लसींची मनपाकडून प्रशासनाकदे मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप लसींचा साठा मिळालेला नसल्याने लसीकरण मोहीम बंद आहे. 


पैसे देऊन खाजगीत मिळतेय लस! 


महापालिकेकडे असलेल्या 14  हजार लसींच्या साठ्याची मुदत 31 डिसेंबरला संपल्याने या लसी नष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या धूत हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड तर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिन लस उपलब्ध आहे. त्यासाठी अनुक्रमे 386 व 250 रुपये घेतले जात आहेत. दरम्यान, राज्य शासनाने जेव्हा लस उपलब्ध होईल, तेव्हा पाठविण्यात येईल, असे पत्र महापालिकेला पाठविले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


कोरोना कसा रोखायचा...


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत औरंगाबाद जिल्ह्याला देखील मोठा फटका बसला होता. एका दिवसांत तब्बल 1300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने जिल्हा हादरला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेता औरंगाबादची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. पण यासाठी लसीकरण मोहीम महत्वाची समजली जाते. मात्र शहरात लसींचा साठाच संपला असल्याने मोहीम कशी राबवायची आणि कोरोना कसा रोखायचा असा प्रश्न स्थानिक आरोग्य यंत्रणाला पडला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aurangabad Corona Update: थंडी वाढताच कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले; औरंगाबादेत एकजण पॉझिटिव्ह