Aurangabad Crime News: कुणाला कधी कुणाशी प्रेम होईल सांगताच येत नाही. आता औरंगाबादमध्ये अशाच एक करामती मेहुण्याची प्रेम कहाणी समोर आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. बायको आजारी असल्याने तिच्या मदतीला आलेल्या अल्पवयीन मेहुणीबरोबर सुत जुळले आणि या नखरेल्या मेहुण्याने चक्क सालीला तिच्या घरातून पळून नेलं. त्यांनतर आता मुलीच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोठ्या भावाचे मृत्यू झाले असून त्यांच्या तीन मुलींचे सांभाळ त्यांनीच केला. दरम्यान दोन मुलींचे लग्न सुद्धा लावून दिले. तिसरी मुलगी 16 वर्षांची आहे. यातील मोठ्या मुलीची सासरवाडी अहमदनगर जिल्ह्यात आहे. तीन महिन्यापूर्वी मोठी मुलीगी आजारी पडल्याने तिच्या मदतीला मेहुणीला पाठवा असा फोन मुलीच्या नवऱ्याने केला होता. आपल्या पुतणीला घरकामात लहान बहिणीची मदत होईल म्हणून चुलत्याने होकार दिला. तेव्हापासून अल्पवयीन मेहुणी आपल्या मेहुण्याचा घरातच राहू लागली.
सर्व सुरळीत सुरु असताना आपल्या पती आणि लहान बहिणीच प्रेम प्रकरण सुरु असल्याच मोठ्या बहिणीला कळाले. एवढच नाही तर तिने दोघांना एकत्र सुद्धा पाहिले. त्यामुळे चुलत्याला फोन करून घडलेला प्रकार सांगत छोट्या बहिणीला घेऊन जाण्याच मोठ्या बहिणीने सांगितले. त्यांनतर चुलत्याने लहान मुलीला पुन्हा आपल्या घरी आणले. दरम्यान 29 मी रोजी रात्रीच्या सुमारास लहान पुतणी घरात नसल्याचं चुलत्याला कळाले. त्यांनी बराच शोध घेतल्यानंतर सुद्धा ती सापडली नाही.
घरच्यांना धक्काच बसला...
लहान पुतणीचा शोध घेऊनही ती सापडत नसल्याने चुलत्याने याची माहिती मोठ्या पुतणीला दिली. त्यांनतर आपला पतीसुद्धा दुपारपासून घरी आलाच नसल्याची माहिती मोठ्या पुतणीने दिली. त्यांनतर पतीचा फोन सुद्धा बंद असल्याने आपल्या लहान बहिणीला पतीनेच पळवून नेल्याचं मोठ्या पुतणीने सांगितले. त्यामुळे अखेर चुलत्याने अल्पवयीन पुतणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याच मेहुण्याने पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यानुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.