एक्स्प्लोर

मोठी बातमी: औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून....

Aurangabad News: घटनेचे गांभीर्य पहाता तात्काळ गुन्हे शाखेचे तीन पथक तपासाठी रवाना करण्यात आले.

Aurangabad Crime : औरंगाबाद शहरातील एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. मात्र तोपर्यंत पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून या आरोपीला ताब्यात घेऊन त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम वैभव काळे ( वय 23 वर्षे रा. आण्णाभाऊ साठे पुतळया जवळ, संजयनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी पोलीस नियंत्रण कक्ष डॉयल 112 वर अज्ञात व्यक्तीने  फोनव्दारे 11.59 ते 14.02  वाजेच्या दरम्यान औरंगाबाद शहरातील कोणतेही एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल केला. विशेष म्हणजे हा फोन तब्बल चार वेळा आला. अशाप्रकारे धमकी देणारा कॉल आल्याने घटनेचे गांभीर्य पहाता तात्काळ गुन्हे शाखेचे तीन पथक तपासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक माहीती वरुन सदर मोबाईलधारकांचे नांव शुभम वैभव काळे असल्याचे समोर आले. 

पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध घेत त्याला MIDC चिकलठाणा परिसरातून ताब्यात घेतले. तसेच पुढील कार्यवाहीसाठी बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे त्याने अशाप्रकारे  धमकी का दिली याचा शोध पोलीस घेत आहे. तर पोलीसांना खोटी माहीती देणारे व अफवा पसरविणाऱ्याविरुध्द औरंगाबाद पोलिसांकडून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन औरंगाबाद शहर पोलीस मार्फत करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या...

Photo : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचे पथसंचलन

Crime Story: आधी जेवणासाठी घेऊन गेले, त्यानंतर बील देत नाही म्हणून अपहरण केले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Saif Ali khan | हायटेक सुरक्षा असतानाही हल्लेखोर सैफच्या घरात शिरलाच कसा?Zero Hour on Nashik | महापालिकेचे महामुद्दे: नाशिक शहराचे उद्यानं धुळ खात पडलीतZero Hour on Dhule| धुळे पालिकेच्या कामाचा क्रमच उलटा, आधी रस्ते केले मग पुन्हा गटारांसाठी  खोदलेABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget