Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) सिल्लोड तालुक्यात एकाच दिवशी दोन मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी सिल्लोड शहरातील औरंगाबाद नाक्यालगत एक आणि तालुक्यातील चारनेरवाडी शिवारात एक असे दोन मृतदेह आढळून आले. या दोन्ही घटनांची पोलिस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.  तसेच कडाक्याच्या थंडीत गारठून एकाचा मृत्यू तर दुसरा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काशिनाथ खंडू गवळी (वय 67 वर्षे रा.न्यू म्हसोबा गल्ली, सिल्लोड) व हिरालाल सुखलाल गोठवाळ (वय 70 वर्षे, रा. चारनेरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ गवळी यांचा मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास औरंगाबाद नाक्यालगत सापडला. पोलिस उपनिरीक्षक बाप्पासाहेब झिंजुर्डे, सुनील तळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान काशिनाथ गवळी गुरुवारपासून बेपत्ता होते. रविवारी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, तसेच नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. तर कडाक्याच्या थंडीत गारठून त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.


दुसऱ्या घटनेत तालुक्यातील चारनेरवाडी-धावडा शिवारातील सिमेंट बांधाजवळी गट नं. 23 मध्ये हिरालाल गोठवाल यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, त्यांचा मृत्यू सिमेंट बांधावरुण जाताना तोल जाऊन खाली पडल्याने झाला असावा अंदाज पोलिसांचा आहे. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


आईनेचं घेतला दोन्ही लेकरांचा जीव...


सिल्लोड तालुक्यात दोन मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबाद शहरात देखील, बहीण-भावाची आईनेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अदीबा फहाद बसरावी (वय 8 वर्षे) आणि अली बिन फहाद बसरावी (वय 4 वर्षे) असे दोन्ही मुलांचे नावं आहेत. मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री आपल्या खोलीत जाऊन झोपले. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नसल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News: कामगार आपल्या विरोधात बोलतो म्हणून वकिलाचं भयंकर कृत्य; घटना सीसीटीव्हीत कैद