Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून (Shri 1008 Chintamani Parsvanath Digambar Jain Mandir) सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीची अज्ञात चोरट्यांनी अदलाबदल केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या 48 तासांच्या आत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad Rural Police) आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी दोघांना मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे. अर्पित नरेंद्र जैन (वय 32 वर्ष रा.शिवपुरी जि. गुणा, मध्यप्रदेश) आणि अनिल भवानीदिन विश्वकर्मा (वय 27 वर्ष रा. शहागड जि. सागर, मध्यप्रदेश) असे आरोपींचे नावं आहे. 


कचनेर येथे असलेल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात महिनाभरापूर्वीच दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसवण्यात आली होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातून ही दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास करत, त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती बसविली. मूर्तीच्या पायाचा रंग पांढरा पडत असल्याने हा सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दोन पथकांची नेमणूक करत तपासाच्या दृष्टीने इतर राज्यात रवाना करण्यात आले होते. 


दोघांना ठोकल्या बेड्या...


मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीची पोलिसांनी पाहणी करत संशयीत आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर एक पथक थेट मध्यप्रदेशात पोहचले. तसेच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मूर्तीची अदलाबदल केली असल्याची कबुली दिली आहे. तसेच सोन्याची मूर्तीचे वेगवेगळे भाग केल्याचे देखील आरोपींनी माहिती दिली आहे. तर यातून मिळालेल्या पैश्यातून आरोपींनी सोन्याचे शिक्के बनवली तर आपल्यावर असलेल्या कर्जाची परतफेड केली असल्याचे देखील समोर आले आहे. 


महागडी दारू पितांना घेतलं ताब्यात...


अर्पित जैन आणि अनिल विश्वकर्मा दोघांनी मिळून दोन किलोच्या सोन्याच्या मूर्तीच्या जागी पितळाची मूर्तीची अदलाबदल केली. त्यानंतर मध्यप्रदेशात जाऊन मूर्तीचे कटर आणि हातोड्याने तुकडे केले. सोन्याचे भाग सराफाला विकून त्यातून आलेल्या पैश्यातून मौजमजा सुरु केली. याच पैश्यातून महागडी दारू पिऊ लागले होते. दरम्यान जेव्हा पोलीस आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा ते एका ठिकाणी दारू पीत बसले होते. पोलिसांनी त्याच अवस्थेत त्यांना तेथून ताब्यात घेतले. 


Jain Mandir Theft: औरंगाबादेतील कचनेरच्या जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; रंग फिकट पडल्याने घटना उघडकीस