Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) कायदा सुव्यवस्थेचे सतत धिंडवडे उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच, पुन्हा एकदा शहरातील कॅनॉट प्लेस (Connaught Place) भागात टवाळखोरांचे दोन गट एकमेकांत भिडल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता टवाळखोरांचे दोन गट एकमेकांवर भिडल्याने जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलिस (Police) येताच या टवाळखोरांनी पोबारा करत पळ काढला. मात्र पुढे जाऊन पुन्हा एसटी कॉलनीत जाऊन तुफान राडा केला. पोलिसांनी या प्रकरणी स्वतःहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. 


याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनॉट प्लेस भागात रोज काम नसताना नाहक फिरणाऱ्या दोन गटात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले. पाहता-पाहता दोन्ही गटातील तरुण अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले. दोन गटात जोरदर हाणामारी सुरु असल्याने परिसरात गोंधळ उडाला होता. तर लोकांची गर्दी देखील पाहायला मिळाली. दरम्यान याबाबत औरंगाबाद शहर पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल येताच  कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस येताच राडा घालणाऱ्या टवाळखोरांनी पळ काढला. 


अन् पुन्हा घातला राडा...


कॅनॉट प्लेस भागात हाणामारीची माहिती मिळताच डायल 112 वरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलिसांना पाहून हाणामारी करणारे तरुण पळून गेले. मात्र त्यानंतर ते पुन्हा एकदा एसटी कॉलनीकडे जाऊन भिडले. यावेळी दोन्ही गटाकडून दगड, रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत  सहा ते सात जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यात झाला एक माजी नगरसेवक पुत्रदेखील नंतर सहभागी झाला असल्याचे बोलले जात आहे. तर या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात (Cidco Police Station) पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. सचिन दिवे, शिवा काळे, आदर्श वैद्य, बन्सर व अन्य टवाळखोरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


औरंगाबादकरांना चार्ली पथकाची आठवण! 


सध्याचे नागपूर पोलीस आयुक्त आणि तत्कालीन औरंगाबाद पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी औरंगाबादमध्ये चार्ली पोलीस पथक तयार करून, शहरात गस्त सुरु केली होती. हे पथक शहरात 24 तास पेट्रोलिंग करत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. शहरातील महत्वाचे ठिकाण आणि महाविद्यालय परिसरात चार्ली पोलीस पथकाची गस्त असल्याने टवाळखोर फिरकत नव्हते. गुन्हेगारांमध्ये देखील या पथकाची प्रचंड दहशत होती. त्यामुळे सध्याची शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पाहता औरंगाबादकरांना चार्ली पथकाची आठवण झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News: महिनाभरापूर्वी सिल्व्हर मेडल जिंकले, स्वयंपाकावरुन झालेल्या वादानंतर विषारी द्रव्य घेऊन तरुणीची आत्महत्या