Gram Panchayat Election 2022 : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत सुरु असतानाच औरंगाबादमध्ये मात्र या निवडणूकीला गालबोट लागलं आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील  सालवडगाव या ठिकाणी बोगस मतदानावरून झालेल्या वादातून मतदान केंद्राच्या परिसराच्या बाहेर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. तर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. तर यात दोन जन जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवींद्र पंढरीनाथ ठोंबरे आणि विनोद रघुनाथ ठोंबरे असे जखमींचे नावं आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यात आज 216 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पद गावात प्रतिष्ठेचं पद समजले जाते, त्यामुळे गावागावात वेगवेगळे गट या निवडणुकीत आमने सामने पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील  सालवडगाव निवडणुकीवरून वाद झाल्याने मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. ज्यात दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर दोन्ही जखमींना पाचोड येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मारहाणीचा आरोप... 


याप्रकरणी मारहाण झालेल्या गटाकडून दावा करण्यात आला आहे की, रवींद्र ठोंबरे हा मतदान करून निघाला होता. याचवेळी विरोधी गटातील दहा ते पंधरा जनांनी त्याला अडवून मारहाण केली. यावेळी एकाने हातात दगड उचलून याच्या छातीवर मारला. ज्यात तो जखमी झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


पोलिसांची घटनास्थळी धाव... 


घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी मतदान केंद्रावर तात्काळ धाव घेतली. तसेच दोन्ही गटाला पांगवले. तर जखमी झालेल्या दोघांना मेडकील मेमो देऊन शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. सद्या गावात शांतता असून, मतदान प्रकिया सुरळीत सुरु आहे. तर जखमी यांच्यावर रुग्णालयात उपचार सूर आहे. 


 पैठण तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक


पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघ असलेल्या पैठण तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात एकही सरपंच बिनविरोध निवडून आला नाही. मात्र 9 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नांदर, आडुळ, बिडकिन व मुधलवाडी या चार ग्रामपंचायतीची निवडणूक मंत्री भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे.  तर सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून, तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिंदे गट विरोधात ठाकरे गट असाच सामना पाहायला मिळणार आहे. 


Exclusive: औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा कथित व्हिडिओ व्हायरल, वातावरण तापलं