Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली असून, प्रातर्विधीसाठी गावालगच्या शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचे तिघांनी अपहरण करून तिला सहा तास डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. तर मुलीचे अपहरण झाल्याचे समजताच पीडितेच्या वडिलांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडित मुलगी सकाळी सात वाजता गावालगत असलेल्या शेतात प्रातर्विधीसाठी गेली होती. दरम्यान गावातीलच तीन आरोपींनी पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी देत तिचे अपहरण केले. मुलगी बऱ्याच वेळची गेली असून, परत न आल्याने आईने तिचा शोध सुरु केला. गावातील ग्रामस्थांनी सुद्धा गावालगत सर्वच ठिकाणी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण मुलगी काही सापडत नव्हती. 


तिघांवर गुन्हा दाखल


बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध सुरु असतानाच, दुपारी दीडच्या सुमारास तिला गावातील एका व्यक्तीच्या शेतातील ओसाड घरात डांबून ठेवल्याची कुणकुण काही ग्रामस्थांना लागली. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेतली आणि मुलीची सुटका केली. यावेळी गावातील आकाश बंडू चव्हाण (वय 22 वर्षे), सुरेश विनोद चव्हाण (वय 21 वर्षे) व शिवाजी इंदल पवार (20 वर्षे ) या तिघांनी आपला पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी देत अपहरण करून येथे डांबून ठेवल्याची माहिती मुलीने दिली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेतात कामासाठी गेलेल्या पिडीत मुलीच्या वडिलांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहे. 


बेपत्ता आईसह मुलाचा विहिरीमध्ये मृतदेह


दुसऱ्या एका घटनेत वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील एका विहिरित आई व मुलाचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याची घटना समोर आली आहे. संगीता रविन पावरा (वय 26 वर्षे ) व रंजीत रविन सोलंकी (वय 03 वर्षे) असे या मृत आई व मुलाचे नाव आहे. महिला मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा बड़वानी येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून संगीता शिवराई शिवारात मंजूरीचे काम करत होती. मात्र त्यांन आत्महत्या केली अपघात आहे याबाबत अजूनही खुलासा होऊ शकला नाही. 


महत्वाच्या बातम्या...


मोठी बातमी! भगर विषबाधा प्रकरणी औरंगाबादमध्ये आठ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल


खाकीतील गुंड! गुन्हेगारालाही लाजवेल असे 'या' पोलीस कर्मचाऱ्याचे कारनामे, ऐकून बसेल धक्का