Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातून बुधवारी एकाचवेळी 10 जण बेपत्ता झाली आहे. ज्यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आवाहन असणार आहे. 


औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबरला ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटनेत एकूण 10 जण बेपत्ता झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यात बिडकीन पोलीस ठाणे ह्द्द्तील3 जण, चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीत 1 जण, सिल्लोड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेसोबत तिचे 2 मुलं असे 3 जण, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 1 जण, कन्नड शहर पोलीस ठाण्यात 1 जण आणि फुलंब्री पोलीस ठाण्यात 1 जण असे 10 जण बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. 


बेपत्ता व्यक्तींची माहिती  


औरंगाबाद ग्रामीणच्या फुलंब्री पोलिसात छोटेखा मलंगखा पठाण (वय 65 वर्षे रा.माळसावळी ता.फुलंब्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मोठा मुलगा अस्लम खा छोटेखा पठाण (वय 22 वर्षे) शेताकडे जाउन येतो असे म्हणुन घरातुन निघुन गेला होता. मात्र अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील तो सापडला नसल्याने फुलंब्री पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे. 


कन्नड शहर पोलिसात सविता माधव पवार (वय 38 वर्षे, रा. कनकावती नगी, ता.कन्नड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती माधव पांडुरंग पवार (वय 45 वर्षे) कोनाला काही एक न सांगता घरातुन कोठेतरी निघुन गेले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिसात मिसींग दाखल करण्यात आली आहे. 


बिडकीन पोलिसात दाखल जितेंद्र गणेश खरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मेघा जितेंद्र खरे कोनाला काही एक न सांगता घरातुन कोठेतरी निघुन गेले आहे. तर बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत दुसऱ्या घटनेत अर्चना प्रकाश जावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील शरद आबाजी जंगले घरात कुणालही काहीही न सांगता निघून गेले आहेत. तर तिसऱ्या घटनेत शालिनी अनिल नरोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती अनिल उद्धव नरोडे घरात कुणलाही काहीही न सांगता निघून गेले आहे. त्यामुळे बिडकीन पोलिसांत मिसींग दाखल करण्यात आली आहे. 


चिखलठाणा पोलिसात कल्याणी सुर्यकांत भोगल (वय 29 वर्षे, रा. माउली नगर पिसादेवी, औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नातेवाईक प्रनिता सुर्यकांत भोगल (वय 40 वर्षे) या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील त्यांचा शोध लागला नसल्याने अखेर चिखलठाणा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. 


सिल्लोड शहर पोलिसात गुंफाबाई तेजराव दनके (वय 50 वर्षे, मंगरूळ ता. सिल्लोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या नातेवाईक असलेल्या मंगला मुकाश निकाळजे (वय 32 वर्षे) या आपल्या एका 4 आणि दुसऱ्या 2 वर्षांच्या मुलासह कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. त्यामुळे गुंफाबाई यांच्या तक्रारीनुसार सिल्लोड शहर पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.             


सिल्लोड ग्रामीण पोलिसात पंडित दादाराव तायडे (वय 50 वर्षे, अंधारी, सिल्लोड) यांनी  पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ पोपट दादाराव तायडे (वय 60 वर्षे, अंधारी, सिल्लोड) हे घरात कुणलाही काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेले आहे. त्यामुळे पंडित तायडे यांच्या तक्रारीनुसार सिल्लोड ग्रामीण पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.