Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून (Murder) केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. अनिता संतोष लांडे (वय 47 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून, मनिषा काकासाहेब लांडे (वय 44 वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 


याविषयी अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील लांडे कुटुंब माहुली शिवारात गट क्रमांक 13 मध्ये वास्तव्यास आहे. घरात अनिता संतोष लांडे व मनिषा काकासाहेब लांडे या दोघी सख्ख्या जावा असून यातील मोठी अनिता या अपंग आहेत. तर लहान मनिषा मनोरुग्ण असल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान सोमवारी रात्री मनिषाचे स्वत: वरील संतुलन सुटल्याने, हातात धारदार शस्त्र (कुऱ्हाड) घेऊन थोरल्या जाऊ अनिता संतोष लांडे यांच्या डोक्यात मारले. त्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. 


पोलिसांची घटनास्थळी धाव... 


दरम्यान याची माहिती गावकऱ्यांनी गंगापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तील मृत घोषित केले. तर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ देखील व्यक्त केली जात आहे. 


मुलं सांभाळणं असह्य झाल्याने घेतला जीव 


दरम्यान गंगापूर येथे महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असतानाच, दोन आठवड्यापूर्वी औरंगाबाद शहरात झालेल्या दोन चिमुकल्यांच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या दोन मुलांना सांभाळणं असह्य झाल्याने आणि त्यामुळे नेहमी होणारी चिडचिडमुळे आईनेच पोटाच्या लेकरांचा गळा घोटला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. लिया फहाद बसरावी (वय 22 वर्षे) असे आरोपी महिलेचं नाव असून, अदीबा फहाद बसरावी (वय 6 वर्षे) आणि अली बिन फहाद बसरावी (वय 4 वर्षे) असे मृत दोन्ही मुलांची नावं आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Abortion Case: औरंगाबादच्या गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; इंजेक्शनचा साठा परजिल्ह्यातून आला