Aurangabad News: सध्या राज्यात पाच शिक्षक मतदारसंघासाठी विधान परिषदेची (MLC Election) निवडणूक होत आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) विरोधात भाजप (BJP) असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान गुरुवारी भाजप उमेदवार किरण पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बावनकुळेंनी प्रचार सभा देखील घेतली. मात्र याच सभेत बावनकुळेंचं भाषण सुरू होताच भाजप नेत्यांनी डुलक्या मारल्या. कुणाला आळस येत होता, तर कोणी चक्क डोळे लावून डुलक्या घेत होते. विशेष म्हणजे हे सर्व कॅमेऱ्यात कैद झालाय.


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी औरंगाबादमध्ये प्रचारसभा ही झाली. या प्रचारसभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री आणि मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. पण जेव्हा बावनकुळे यांचे भाषण सुरू झालं त्यावेळी भाजप नेते अक्षरशः डुलक्या घेताना पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना आळस येत होता, सहकारमंत्री अतुल सावे चक्क डोळे लावून डुलक्या घेत होते. तर भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे देखील डोळे लागले होते. 


भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन...


मराठवाडा शिक्षक मतदार संघासात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले किरण पाटील यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. गुरुवारी किरण पाटील यांनी बावनकुळे यांच्या उपस्थित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे आणि भाजपचे मंत्रीही उपस्थित होते. दरम्यान यावेळी रॅली काढत आणि प्रचारसभा घेऊन भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा दावाही उपस्थित भाजप नेत्यांनी केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nana Patole : सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं