एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संतापजनक... औरंगाबादमध्ये जिवंत कुत्र्याला दोरीला बांधून ओढले, गुन्हा दाखल
औरंगाबादमध्ये देखील जिवंत कुत्र्याला दोरीला बांधून मोटरसायकवरून फरफटत नेल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. त्यामुळे या निर्दयी दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
औरंगाबाद : केरळमध्ये हत्तीला खाण्यासाठी अननसामधून स्फोटक देऊन मारल्याचा प्रकरण ताजे असतानाच औरंगाबादमध्ये देखील जिवंत कुत्र्याला दोरीला बांधून मोटरसायकवरून फरफटत नेल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अत्यंत निर्दयीपणे जिवंत कुत्र्याच्या गळ्याला दोरी बांधून फरपटत नेणार्या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहराच्या अजबनगर भागातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या 14 सेकंदाचा व्हिडीओमध्ये एका दुचाकीवरून दोघेजण कुत्र्याच्या गळ्याभोवती दोरी बांधून फरपटत घेऊन जात असल्याचं दिसत आहे. जिवंत कुत्र्याला अत्यंत क्रूरपणे या व्यक्ती फरफटत नेत आहेत. कुत्रा या तून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्या दुचाकीच्या मागे चालणाऱ्या चार चाकी गाडीमधून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ॲनिमल पेयर्स आणि पीपल फॉर ॲनिमल या श्वान प्रेमी संघटनेच्या लोकांनी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही घटना औरंगाबादेतीलच आहे का याची शहानिशा केली आणि शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
श्वान प्रेमींनी सदरील व्हिडीओ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केला आहे. आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना या घटनेची माहिती दिली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही पोलीस महासंचालकांना तात्काळ या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालकांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारांना अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत.
हा व्हिडिओ शहरातील अजबनगरमधील असल्याची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे. आरटीओच्या सहाय्याने दुचाकीच्या मालकाचा शोध घेतला जात आहे, अशीही माहिती देखील पोलीस निरीक्षक यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement