Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी भागात नशेच्या धुंदीत असणाऱ्या तरुणांच्या घोळक्याने एकाला जबर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. चार-पाच तरुणांनी एकत्र येत एकास लाथा बुक्क्यांनी अक्षरशः फोडून काढल्याचे या व्हिडिओत दिसत असून मारहाण करणारे आणि मार खाणारे सगळेच नशेत असल्याचे दिसून आले. 


मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही घटना घडत असताना बाजारातील इतर लोक हा सगळा तमाशा पहात बसल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी भागात संध्याकाळच्या सुमारास ही घटना झाल्याचे दिसते. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणातून मारहाणीचे प्रकार सध्या चांगलेच वाढले आहेत. दिवसाढवळ्या मारहाण करणे, पेटवून देणे असेही काही व्हायरल व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. त्यामुळे पोलीस नक्की करतात काय? पोलिसांचा गुन्हेगारांवर बडगा आहे का? गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटते का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. 


दोन तरुणांकडून एकाला जबर मारहाण, लाथा बुक्क्या मारत केले रक्तबंबाळ 


छत्रपती संभाजीनगर शहरात दोन तरुणांकडून एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संभाजीनगरचा रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना असल्याचे सांगण्यात आले असून या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्टच असून किरकोळ कारणातून इमारहाण झाल्याचे दिसत आहे.


हेही वाचा:


Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!