Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात दोन तरुणांकडून एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना असल्याचे सांगण्यात आले असून या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


मागील काही दिवसांपासून शहरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून किरकोळकरणांमधून या घटना झाल्याचे उघड होत आहे. गेल्या काही दिवसात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणे, उद्योजकाला कामावरून काढल्याच्या रागात मारहाण असे प्रकार समोर आले आहेत.


दरम्यान , शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात वादावादीतून दोन जणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी मिळून केली बेदम मारहाण


कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या राहुलने उद्योजक नागेश्वर मुळे यांना धडा शिकवण्याचे ठरवले. यानुसार त्यांनी इतर साथीदारांना बोलावून उद्योजक मुळे यांना लाथा बुक्क्यांनी आणि दांड्याने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा:


Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!