Chhatrapati Sambhajinagar: राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला असून मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची (Rain in Marathwada) शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) तसेच प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांना आज (5जुलै) जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला. दरम्यान, पुढील तीन दिवसात पावसचा जोर वाढणार असून मराठवडयात या आठवड्यात पाऊस सरासरीहून अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालन्यात पुढील तीन दिवस मुसळधार
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील चार दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, आज दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
हलक्या व मध्यम सरींची हजेरी
मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची हजेरी राहणार असून येत्या तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवले. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला असून त्यानंतर यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.
हेही वाचा:
सावधान! 5 ते 10 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या भागात कसा असणार पाऊस?