एक्स्प्लोर
शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधवांना काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा पाठिंबा
अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. परंतु हर्षवर्धन जाधवांना त्यांनी पाठिंबा दिला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी पाठिंबा घोषित केला.
यापूर्वीही हर्षवर्धन जाधव यांना शांतिगिरी महाराजांनी पाठिंबा दिला आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू धर्मीयांचं मोठं शक्तीस्थान मानलं जातं. सत्तार आणि शांतिगिरी महाराजांच्या पाठिंब्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर युतीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. परंतु हर्षवर्धन जाधवांना त्यांनी पाठिंबा दिला आहे.
मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते, हर्षवर्धन यांनीही आपण निवडून आल्यास नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या भेटीचा आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याचा काही संबंध आहे का याची देखील कूजबूज सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुरु आहे.
VIDEO | राहुल गांधींना तुरुंगात डांबा : उद्धव ठाकरे | नांदेड
औरंगाबादमधून शिवसेना-भाजप महायुतीतर्फे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आलं आहे. एमआयएम राज्यात लोकसभेची एकमेव जागा लढवणार असून ती औरंगाबादची जागा आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे निवडणूक लढवत आहेत.
हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेल्या शांतीगिरी महाराजांना जवळपास दीड लाख मतं मिळाली होती, आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हा 'हँग झालेला नेता' असल्याची टीका अब्दुल सत्तार यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण आणि अकलेचा संबंध असता, तर त्यांनी 2014 ची निवडणूक जिंकली असती, अशी टीका अब्दुल सतार यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement