एक्स्प्लोर

स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहील; राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यानं चंद्रकांत खैरे यांची खदखद

राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यानं औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे नाराज झाले आहे. त्यांच्या ऐवजी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्यात आली आहे.

औरंगाबाद : शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यानं माजी खासदार चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत. मला नाही, मात्र, माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. आदित्य साहेबांना आवडलं नाही. मी माझं काम करत राहील. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलंय. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काम केलं. त्यांना आता वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. पण मी स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिक राहील. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं, अशी खदखद माजी खासदारी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलीय. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर, तिकडे भाजपकडून औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिसरी उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधी रामदास आठवले आणि उदयनराजेंची नावं घोषित झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंची राज्यसभेवर वर्णी लागावी, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. याशिवाय संजय काकडे यांनाही पुन्हा संधी मिळाली नाही. तर काँग्रेसनं राजीव सातव यांचं नाव घोषित केलंय. मात्र, महाविकासआघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. ही जागा कुठल्या पक्षाकडे जाते. हे पाहणं आता महत्वाचं असेल. दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर, राहुल गांधींच्या विश्वासामुळे 45 व्या वर्षी राज्यसभेत मला अनेक ऑफर होत्या पण शिवसेना सोडली नाही शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरही खैरे यांनी निशाणा साधला आहे. आता ती बाई खूप चांगलं काम करेल. हिंदी बोलते इंग्रजी बोलते हरकत नाही. पण, मी वीस वर्षे लोक सभा गाजवली. मी इकडे तिकडे कधी गेलो नाही. मला अनेक ऑफर होत्या. मरेपर्यंत शिवसैनिक राहील. बाकीचे येतात आणि जातात. कितीजण कितीजण गेले. लोकांच्या सेवेसाठी आघाडीसोबत गेले, अशी खदखद खैरे यांनी व्यक्त केलीय. आता बोलावल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोरला आणलं. मात्र, तरीही हव्या तितक्या जागा शिवसेनेला मिळवता आल्या नाही. उद्धव ठाकरे यांनी एकटे असताना 67 जागा आणल्याची आठवण करुन देत पक्षात जुने लोक महत्वाची असल्याचं अधोरेखीत केलं. Rajya Sabha Election | शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी घोषित

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget