एक्स्प्लोर

उमेदवारी अर्ज भरण्याची शुभ वेळ काय? इच्छुकांची पावलं ज्योतिषांकडे

शुभ दिवसातील कुठल्या वेळी अर्ज भरावा, कुठल्या वेळेत तो निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा, अर्ज देताना पूर्वेकडे उभं राहावं की पश्चिमेकडे, इतक्या छोट्या प्रश्नांचा भडिमार ज्योतिषांवर होत आहे.

औरंगाबाद : निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांची असू दे किंवा खासदारकीची, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार शुभ-अशुभ दिवस पाहतोच. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवारही अर्ज भरताना ग्रह-तारे आणि शुभ-अशुभ दिवस कोणता, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांचे उंबरठे झिजवत आहेत. औरंगाबादमधले मुळे गुरुजी सध्या चांगलेच व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक अर्ज भरण्यासाठी कोणत्या राशीला कोणता दिवस आणि कुठली वेळ शुभ आहे, याचं गणित जुळवण्यात त्यांचा वेळ जात आहे. महाराष्ट्रात यावेळी चार टप्प्यात निवडणुका होत आहेत. प्रत्येक टप्प्यात अर्ज भरण्यासाठी सात दिवस देण्यात आले आहेत. आता हे सात दिवस ठरवताना निवडणूक आयोगागाने पंचांगाचा अभ्यास केला नसला, तरी या सात दिवसात कुठला दिवस शुभ आहे हे नेत्यांना जाणून घ्यायचं आहे. हे शुभ दिवसापुरतं मर्यादित नाही, तर शुभ दिवसातील कुठल्या वेळी अर्ज भरावा, कुठल्या वेळेत तो निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा, अर्ज देताना पूर्वेकडे उभं राहावं की पश्चिमेकडे, इतक्या छोट्या प्रश्नांचा भडिमार ज्योतिषांवर होत आहे. 2019 ची निवडणूक सिंह, वृषभ, कर्क, मीन आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी राहील असा जोतिषांचा अंदाज आहे. ज्योतिषांच्या मते या चार राशींना निवडणूक अर्ज भरताना कुठले दिवस शुभ आणि कुठले अशुभ आहेत, यावर एक नजर टप्पा पहिला 18 मार्च ते 25 मार्च या सात दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. ज्योतिषांच्या मते- 18 उत्तम दिवस, 19 चांगला दिवस, 20 वर्ज्य दिवस, 21 क्षय दिवस, 22 शुभ दिवस, 23 तारखेला 12 वाजेपर्यंत चांगला दिवस, 24 अनिष्ट दिवस, 25 शुभ दिवस. 18, 19, 22, 23 आणि 25 मार्च  याच दिवशी अर्ज भरण्याचा ज्योतिषांचा सल्ला टप्पा दुसरा 19 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान निवडणूक अर्ज दाखल करायचा आहे ज्योतिषांच्या मते- 19, 22, 23 आणि 25  हे शुभ दिवस आहेत, तर 20, 24 आणि 26 अनिष्ट असल्याचं ज्योतिषांचं मत टप्पा तिसरा 28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ज्योतिषांच्या मते- 28, 29 30 तारखेला 2 वाजेपर्यंत शुभ दिवस, 31 शुभ, 1 सामान्य, 2 तारखेला सकाळी 9 वाजता शुभ, 3 आणि 4 अशुभ दिवस आहेत. 4 तारखेला अमावस्या आहे टप्पा शेवटचा (चौथा) 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ज्योतिषांच्या मते- 2 तारखेला सकाळी 9 वाजता शुभ, 3 आणि 4 अशुभ (वर्ज्य) दिवस आहेत. 4 आणि 5 तारखेला अमावस्या असल्याने अशुभ. 6, 7 शुभ दिवस, 8 तारखेला सकाळी 10 पर्यंत चांगला दिवस, 9 तारखेला 4 वाजेपर्यंच चांगला मुहूर्त नेते केवळ निवडणुकीतील आपलंच भविष्य पाहत नाहीत, तर विरोधात उभ्या असलेल्या नेत्याचंही राहूबल गुरुबल विचारतात. निवडून येण्यासाठी कुठली पूजा, गोसेवा दानधर्म करावा, कुठला यज्ञ करावा, याचीही माहिती घेतली जाते. ज्योतिषींच्या मते सध्याचं ग्रहमान शिवसेना-भाजपच्या बाजूने आहे. कोणी याला थोतांड मानतं, तर कोणाची यावर श्रद्धा आहे. याला श्रद्धा म्हणायचं, अंधश्रद्धा म्हणायचं, की थोतांड हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, मात्र सध्या ज्योतिषांच्या घराकडे वळलेली नेत्यांची पाऊल मात्र 'राजकीय श्रद्धा' अधोरेखित करतात, हे नक्की

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget