एक्स्प्लोर

BJP MNS Agitation : औरंगाबादमध्ये पाण्यासाठी आंदोलन, भाजप आणि मनसे एकत्र

औरंगाबाद शहरातील सिडको आणि हाडकोतील नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

BJP MNS Agitation : औरंगाबादमध्ये पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आज पहिल्यांदाच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील सिडको आणि हाडकोतील नागरिकांनी महापालिका पाणीपुरवठ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद शहरातील सिडको हडकोमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणी येत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे सिडको हाडकोतील नागरिकांसह भाजप आणि मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिडकोतील पाणीपुरवठा विभागांमध्ये धडक मारुन आंदोलन सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी याच भागातील लोक सिडकोतील एन 5 इथे पाण्याच्या टाक्याजवळ दिवसभर आंदोलन केले होते. त्यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालाच नाही. शिवाय प्रत्येकाला 9 ते 10 दिवसांनंतर एकदा पाणी मिळू लागल्यामुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. त्यामुले नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 यावेळी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, राज्यात भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दुसरीकडे औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर स्थानिक भाजपचे नेतेही आता मनसेच्या नेत्यांना सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. या उन्हाळ्यात पाण्यासाठी भाजपने सिडको हाडकोमध्ये आंदोलन लावून धरले आहे. त्यात आता भाजपला मनसेनेही साथ दिली आहे. महानगरपालिका प्रशासनाने जर लवकर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करु असा इशारा देखील मनसेच्या नेत्यांनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Abhijeet Dipke:जंतरमंतर चंद्रपूर पोलिसांच्या अंडर कसे आले? CJP कार्यकर्त्यांना नोटीशी येताच अभिजीत दिपकेंचे महाराष्ट्र पोलिसांवर सवाल, म्हणाले...
जंतरमंतर चंद्रपूर पोलिसांच्या अंडर कसे आले? CJP कार्यकर्त्यांना नोटीशी येताच अभिजीत दिपकेंचे महाराष्ट्र पोलिसांवर सवाल, म्हणाले...
संभाजीनगरच्या पदवीधर निवडणुकीत महायुतीत बंडखोरी? भाजपचे एम. के. देशमुखही मैदानात; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
संभाजीनगरच्या पदवीधर निवडणुकीत महायुतीत बंडखोरी? भाजपचे एम. के. देशमुखही मैदानात; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget