नवी दिल्ली : भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन' लसीची किंमत राज्यांसाठी प्रति डोस 200 रुपयांनी कमी केली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने यापूर्वी कोविड -19 च्या कोवॅक्सिन लसीची किंमत राज्य सरकारांसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये एक डोससाठी ठरवली होती. मात्र आता कंपनीने राज्य सरकारांसाठी लसीची किंमत कमी करुन 400 रुपये केली आहे.






याआधी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने बुधवारी राज्यांना देण्यात आलेल्या कोविशिल्ड लसीच्या किंमतीत 100 रुपयांची कमी केली आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत कमी केली आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली. नवीन किमतीनुसार सीरमची 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी आता 400 ऐवजी 300 रुपये प्रति डोस असणार आहे.






महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण


वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिक नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनानं मोठ्या जबाबदारीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


इतर बातम्या