Aurngabad Crime News : आतापर्यंत तुम्ही एखाद्या चोरांच्या टोळीने घर लुटल्याचं ऐकलं असेल पण, चोरांनी आख्खं गाव लुटल्याचं कधी ऐकलं का? पण हे प्रत्यक्षात घडलेय. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच प्रसंग औरंगाबादमधील पैठणमध्ये घडलाय. होय चोरांनी संपूर्ण गाव लुटण्याचा प्रयत्न केला. गावातील सर्व घरांना कड्याही लावल्या. चोरांचा गाव लुटण्याचा प्रयत्न यशस्वी झालाच होता, पण एका मोबाईलमुळे त्यांचा डाव हुकला. अन् हाती आलं ते घेऊन चोरट्यांना पळ काढावा लागला


औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील बागायतदारांचं आणि कापूस व्यापाऱ्यांचं गाव अशी ओळख असलेल्या वडजी गावात हा प्रकार घडला. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास काही चोरट्यांनी गावात प्रवेश केला. अख्खं गाव लुटण्याचा प्लॅन करून आलेल्या या चोरट्यांनी संपूर्ण गावातील घरांच्या कड्या लावून घेतल्या. गावलुटीसाठी आलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला गावातील सखाराम दामोदर वाघमारे यांच्या घरात प्रवेश करत घरातील सोन्याची दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हाती अंदाजे साडेसात लाख रुपयांचं सोनं सुध्दा लागलं, पण गावकरी जागी झाली पण सर्वांच्या कड्या लागलेल्या असतांना कुणालाच बाहेर पडता येईना. पण गावातील लोकांच्या मोबाईलच्या टॉर्च सुरू झाल्याचं पाहता चोरट्यांनी पळ काढला आणि गाव लुटीचा प्लॅन फसला.   


पाहा व्हिडीओ -



गावकरी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी दब्या पावलेने गावात प्रवेश केला. गावातील घरांना चोरट्यांनी बाहेरुन कड्या लावल्या. त्यांनंतर वाघमारे कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. संपूर्ण घराची लाईट बंद करत नव्याने बांधलेल्या घरातील प्रत्येकी खोलीची चोरट्यांनी चाचपणी केली. घरातील पेट्या शेतात नेऊन कुलूप फोडून ऐवज लंपास करम्याचा प्रयत्न केला. यामध्ये साडेबारा तोळं सोनं, चांदी आणि 50 हजार रुपयांची रोक रक्कम होती. चोरटे ऐवढ्यावरच थांबले नाहीत,  त्यांनी पुन्हा घरात झाडाझडती सुरु केली. त्यावेळी अचानक सखाराम वाघमारेंना जाग आली.  ते झोपेतून उठले व दुसऱ्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना बाहेरून दरवाजा बंद केल्याचे दिसून आले. लाईटही बंद असल्याने पाहुन त्यांना चोरट्यांचा संशय आला. त्यांनी दरवाजाला कान लावून कानोसा घेतला असता चोरटे घराची धुंडाळणी घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मोबाइलवरुन शेजारच्याशी संपर्क केला. त्यानंतर अन्य गावकऱ्यांनाही फोन केले. त्यानंतर सर्वांना आपल्या घराच्या बाहेरुन कडी लावल्याचं समजले. सर्वांनी एकत्र मोबाईल लाईट लावल्या. त्यानंतर चोरट्यांनी आहे ते घेऊन गावातून पळ काढला.