Crime in Aurangabad : आजोबांनी आपल्या आत्या भावाला दिलेला मोबाईल आपल्याला मिळावा म्हणून एकाने आपल्या आतेभावाला ठार केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेला आतेभाऊ आणि आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत 3 डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह मिळून आला होता. पैठण पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. या दरम्यान त्याच वयाचा एक मुलगा औरंगाबाद शहरातील वाळूज पोलीस ठाण्यात एक मुलगा हरवला असल्याची तक्रार 2 डिसेंबर रोजी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे पैठण पोलिसांनी वाळूज पोलिसांशी संपर्क साधला. सापडलेला मृतदेह हा त्या हरवलेल्या मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात या मुलाची हत्या झाली असल्याचे पोलिसांना दिसून आले. 


पोलिसांना सापडलेला मृतदेह हा  वाळूज जवळील शेंदूरवादा गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. या अल्पवयीन मुलाची हत्या त्याच्या मामेभावाने केली असल्याचे समोर आले. 


मयत तरुण आणि आरोपी दोन्ही आत्या-मामा भाऊ असून दोघेही 16-17 वर्षांचे आहेत. तर मयत अल्पवयीन मुलाला त्याच्या आजोबांनी मोबाईल घेऊन दिला होता. हाच मोबाईल फोन आरोपी अल्पवयीन मुलाला हवा होता. त्यासाठी त्याने कट रचला आणि आत्या भावाला बिर्याणी आणि दारू पाजण्याची ऑफर दिली. पैठण तालुक्यात बिडकीन मधील एका बिर्याणी सेंटरवर दोघांनी बिर्याणी खाल्ली .बाजूच्या दारूच्या दुकानातून एक दारूची बॉटल घेतली.  त्याचवेळी आरोपीने तुझ्या नव्या मोबाईल मधून माझा फोटो काढशील का असं म्हटलं आणि तो स्वतः विहिरीच्या काठावर उभा राहिला. फोटो काढून झाल्यानंतर तुझा ही फोटो काढतो म्हणून त्याला विहिरीच्या काठावर उभं केलं आणि क्षणार्धात विहिरीत ढकलून दिलं. आपल्या भावाला थोडं पोहता येत होतं त्यांनी मोटारला लावलेला दोर पकडला. जीव वाचवण्याची त्याची धडपड आरोपी मामे भावाच्या लक्षात आल्यानंतर त्याने विहिरीच्या बाजूवरचा एक दगड घातला त्याच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिला दगड लागला नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा दगड घेतला आणि आपल्या आते भावाच्या डोक्यात घातला आणि मोबाईल घेऊन पळ काढला. वाळूज पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: