Aurangabad News Update : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायती पैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला 15 पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालय. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपसोबत जात एकनाथ सिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत जनतेशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे राज्यभर शिनसेनेच्या बाजूने वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीतून शिंदे गटाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
औंगाबाद
1 : वडगाव कोल्हाटी 17 जागा शिंदे गट
11 जागेवर(संजय सीटसाठ, शिंदे गट )
4 शिवसेना
2 भाजप
सिल्लोड
1 उपळी सत्तार(शिंदे गट )
2 नानेगाव सत्तार(शिंदे गट )
3 जांभळा सत्तार(शिंदे गट )
गंगापूर
1अगरकानडगव- भाजप
2 ममदापूर - शिवसेना ठाकरे गट
वैजापूर
1 पणवी खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट
2 लाख खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट
पैठण
1 खादगाव राष्ट्रवादी
2 खेरडा भुमरे शिंदे गट
3 नानेगाव भुमरे शिंदे गट
4 आपेगाव भुमरे शिंदे गट
5 अगर नांदूर भूमरे सशिंदे गट
6 शेवता भुमरे शिंदे गट
7 तांडा बूदृक भुमरे शिंदे गट
महत्वाच्या बातम्या