Aurangabad : मैत्रिणीला गाडीच्या टँकवर बसवून अश्लिल चाळे करणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. अश्लिल चाळे करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तपास करून औरंगाबादमधील जिन्सी पोलिसांनी या स्टंटबाज तरूणाला ताब्यात घेतले आहे. 


दुचाकी वेगाने धावत असताना तरुणीला गाडीच्या पेट्रोल टँकवर बसवून अश्लिल चाळे करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार औरंगाबादमध्ये अपघातांसाठी आणि सतत वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर घडला आहे. 


जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक केंद्रे यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, "औरंगाबादमधील जालना रोडवर एक तरूण आपल्या दुचाकीच्या टँकवर एका तरूणीला बसवून अश्लिल चाळे करत होता. या जोडप्याच्या या अश्लिल चाळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे आम्ही याबाबतचा तपास केला. त्यावेळी स्टंट करणाऱ्या तरूणाची आम्हाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार एका चहाच्या टपरीवरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं." 


नेमकं काय घडलं?
औरंगाबादमधील क्रांती चौकात मित्रांसोबत हा तरूण बोलत थांबला असतानाच त्याला मैत्रिणीचा फोन आला. त्यावेळी तू आम्ही असताना तिच्यासोबत फोनवर बोलत आहेस, तर तू तिला आपल्या गाडीवर बसवून तडफ चित्रपटातील सीन प्रमाणे रस्त्यावर चुंबन करण्याचे आव्हान मित्रांनी दिले. मित्रांचे आव्हान स्वीकारत मैत्रिणीला फोन करून बोलावून घेतले आणि शहरातील जालना रोडवरून आपल्या गाडीच्या टँकवर बसवून चुंबन घेत या जोडप्याने स्टंटबाजी केली. या प्रकारानंतर थोड्याच वेळात  जोडप्याच्या अश्लिल चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला. त्यामुळे औरंगाबादमधील जिन्सी पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन स्टंट करणाऱ्या तरूणाचा शोध घेतला. ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या कृत्याची या तरूणाने कबुली दिली अशी माहिती विनायक केंद्रे यांनी दिली. 


Aurangabad : औरंगाबादमध्ये बाईकवर किसिंग, स्टंटबाज किसरला पोलिसांचा हिसका




महत्वाच्या बातम्या