मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा विरोधक आणि राजकीय वर्तुळात होत आहेत. यातच आता शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेल्या वक्तव्यामळे त्याला आणखीनच खतपाणी मिळाले आहे. "रश्मी ठाकरे  (Rashmi Thackeray ) मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. 


अब्दुल सत्तार म्हणाले, "रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं अशी चर्चा होत आहे. जर असं झालं आणि शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उध्दव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर सर्वच शिवसैनिकांना आनंद होईल. त्या सामना पेपर चांगला चालवत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून सामनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. ही जबाबदारी त्या चोखपणे पार पाडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील. त्यामुळे माझ्यासह सर्वच शिवसैनिकांना आनंद होईल असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
 
चंद्रकांत पाटील यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे नाव
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील यांनीही या आधी मुख्यमंत्री बदलावरून वक्तव्य केलं होतं. "मुख्यमंत्र्याची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्यावा. त्यांचा इतर कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे चार्ज द्यावा" असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. 


Abdul Sattar :रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल - अब्दुल सत्तार  



महत्वाच्या बातम्या