Maharashtra Omicron Cases: राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत आज मोठी वाढ झाली आहे. तब्बल 351 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये औरंगाबाद शहरात सर्वाधिक 148 रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या 351 रुग्णांमुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 4 हजार 345 वर गेली आहे. या एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 334 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 8 हजार 904 नमनुे जनकुीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असनू त्यापैकी 7 हजार 858 नमन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तर 1 हजा 46 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 

आज आढळलेले ओमायक्रॉनबाधित

शहर ओमायक्रॉनबाधित
औरंगाबाद 148
नाशिक 111
पुणे (मनपा) 72
पुणे (ग्रामीण) 12
पिंपरी-चिंचवड 05
यवतमाळ 02
सातारा 01

राज्यातील स्थिती

राज्यात आज 2 हजार 831 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8395 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 30,547 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 8 हजार 695 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 76 लाख 69 हजार 772 इतकी झाली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha