Aurangabad Crime : औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात (Kitchen) मिठात पुरलेला मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा केवळ सांगाडा (Skeleton) असल्याने मृतदेह महिलेचा आहे की पुरुष याबाबत खात्री होऊ शकलेली नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. तसंच नरबळीचाही प्रकार असू शकतो असाही प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर आहे. ज्यात तळमजल्यात सात तर वरच्या मजल्यात तीन रुम बांधलेल्या आहेत. दरम्यान सात महिन्यांपूर्वी शेळके यांनी काकासाहेब भुईगड (रा. धानोरा, ता. फुलंब्री) यांना तळमजल्यात दोन खोल्या भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिल्या होत्या. भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्यास होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी आपण नवरात्रीसाठी जात असल्याच सांगून भुईगड कुटुंबासोबत गेले होते. अनेकदा फोन करुन भाड्याचे पैसे मिळत नसल्याने आणि नंतर फोन उचलत नसल्याने शेळके यांनी भुईगड यांच्या खोलीचा कुलूप तोडून घर उघडले असता त्यांना धक्काच बसला. 


मिठात पुरलेला मृतदेह आढळला...


भुईगड यांचा फोन बंद असल्याने शेळके यांनी त्यांचा घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील गृहोपयोगी साहित्य गायब होते. तर घरातील किचन ओट्याखाली खोदकाम करुन तो सिमेंट-वाळूने बंद केलेला आणि त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू ठेवलेले दिसून आल्याने शेळके यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी खोदकाम सुरु केले. यावेळी त्यांना एका चादरीत मिठात गुंडाळलेला कुजलेला मृतदेह दिसल्याने शेळके यांना धक्काच बसला. त्यांनी याची माहिती तात्काळ वाळूज पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल होऊन वाळूज पोलिसांनी पंचनामा केला.


नरबळीचा संशय


शेळके यांनी घराचा दरवाजा उघडला असता, त्यांना घरातील किचन ओट्याखाली खोदकाम करुन तो सिमेंट-वाळूने बंद केलेला आढळलं. विशेष म्हणजे त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू ठेवलेले दिसून आले आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकार नरबळीचा असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र जोपर्यंत काकासाहेब भुईगड आणि त्याचे कुटुंबातील सदस्य पोलिसांना मिळत नाही, तोपर्यंत याबाबत अधिकृत कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही. 


पत्नीच्या भावाच्या भीतीने मृतदेह घरातच पुरला 


औरंगाबाद येथील वाळूज येथील समता कॉलनीमध्ये आढळलेल्या मृतदेहाचं गुढ उकललं आहे. हा प्रकार नरबळीचा नसून भाडेकरूने पत्नीच्या भावाबरोबर असलेल्या वादामुळे हत्या करून घरातच मृतदेह पुरल्याचं समोर आलंय. वाळूज येथील समता नगर भागातील घरमालक सूर्यकांत शेळके यांच्या घरात किचनवट्याखाली एक शेंदूर लावलेला दगड आढळल्यानंतर पोलिसांनी तपास केला. यावेळी या खोलीत भाड्याने राहणाऱ्या भाऊसाहेब भुईगळ याला ताब्यात घेतले असता पोलिसांच्या चौकशी अंती ही बाब उघडकीस आलीय.  
मयत महिला ही आरोपीची पत्नी असून तिचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला आहे. परंतु, पत्नीच्या भावाचा लग्नाला विरोध असल्याने मृत्यूमुळे तिच्या भावापासून धोका निर्माण होईल म्हणून आरोपीने तिचा मृतदेह घरातच पुरला, अशी माहिती वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली. 


संतापजनक! स्कूलबसमध्ये घुसून रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे, पालकांनी सापळा लावून दिला चोप