Aurangabad News : औरंगाबाद पोलीस आयुक्तालयासमोर (Aurangabad Police Commissioner Office) स्वत:ला पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (1 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता औरंगाबाद पोलीस आयुक्तालयासमोरच या महिलेनं स्वतःला जाळून घेतलं होतं. सविता दीपक काळे (वय 32 रा. मांडवागाव, ता.गंगापूर) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला शेजाऱ्यांकडून नेहमी मारहाण होत होती. पोलिसात अनेकवेळा तक्रार जाखल करुन देखील शेजाऱ्यांचा त्रास सुरुच होता. त्यामुळं तिनं पोलीस आयुक्तालयासमोर स्वतः जाळून घेतलं होतं.
सदर महिलेला शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून सतत मारहाण केली जात होती. महिलेला मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील सीसीटीव्हीत समोर आला आहे. यानंतर तिने पोलीस आयुक्तालयासमोरच स्वतःला पेटवून घेतलं होतं. आता या महिलेचा मृत्यू झाला आहे. शेजाऱ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी महिलेनं पोलिसात अनेकवेळा तक्रारी देखील दाखल केल्या होत्या.
गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महिलेनं घेतलं होतं पेटवून
गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पेटवून घेतले होतं. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विजवत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केलं होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादाच्या करणातून या महिलेने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेचे आणि तिच्या पतीचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. या महिलेने थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. पेटवून घेतल्यानंतर सदर महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु असतानाच आज तिचा मृत्यू झाला.
पेटवून घेतलेल्या सदर महिलेला पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही महिला 60 टक्के भाजली होती. त्यानंतर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान पहाटे महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता औरंगाबाद पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Aurangabad: पोलिस आयुक्त कार्यालयासमोरच महिलेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, अंगावर घेतले...