Health News: संशोधकांना मानवी पेशींमध्ये असलेल्या प्रथिन्यांमध्ये अँटी एजिंगचे (Anti-ageing ) कार्य होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ATSF-1 हे प्रथिने नवीन पेशी (Cell) तायर करण्यासाठी तसेच मायटोकॉन्ड्रिया सारख्या विषाणूमुळे खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी ATSF-1 या प्रथिनांचा शोध लावला आहे. ऑस्ट्रेलियातील (Australia) क्वीन्सलँड ब्रेन इन्स्टिट्यूट (QBI) आणि क्वीन्सलँड विद्यापीठ हा शोध लावला आहे.
मायटोकॉन्ड्रिया या पेशीपासून तयार झालेले काही पदार्थ हे उर्जा देण्यासाठी मदत करतात. तर काही पदार्थांमुळे शरीराला हानी देखील पोहचू शकते. त्यामळे यावर काहीतरी उपाय शोधणं गरजेचं असल्याचं देखील शास्त्रज्ञाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाने लावलेल्या या शोधामुळे शरीरासाठी अनेक उपयुक्त गोष्टींचा शोध लावण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या शोधामुळे माइटोकॉन्ड्रियल सारखा ज्यांना आजार आहे त्यांना मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही वेळेस जास्त तणाव आल्याने माइटोकॉन्ड्रियल डीएनए खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी ATSF-1 हे प्रथिनं या डीएनएच्या दुरुस्तीसाठी मदत करेल असा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या आजरातून तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.
याविषयी माहिती देताना शास्त्रज्ञांनी रेस कारचे उदाहणर दिले आहे. रेस कारमध्ये बिघाड झाल्यावर त्यामध्ये पिटस्टॉपची गरज असते. तसेच शरीरातील पेशींमध्ये काही बिघाड झाल्यास काही प्रथिनांची गरज असते. त्यामुळे ATSF-1 हे प्रथिनं शरीरामध्ये पिटस्टॉपचे काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शास्त्रज्ञांनी ATFS-1 C याचा देखील अभ्यास केला आहे. यामुळे शरीरातील कार्यक्षमता वाढून चांगल्या आरोग्यासाठी चालना मिळण्यास मदत होते. शरीरातील काही पेशी जास्त काळ जगू शकत नाही. पण या प्रथिनांमुळे त्या जेवढ्या काळ जगतील तेवढा वेळ त्या निरोगी जगण्यास मदत होऊ शकते.
शरीरामधील पेशींमध्ये दुरुस्तीचे काम कसे होते हे जाणून घेण्यसाठी करण्यात आलेलं हे महत्त्वपूर्ण संशोधन असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे शरीरात माइटोकॉन्ड्रिया पासून होणाऱ्या नुकसानामुळे बचाव होण्यास देखील मदत होऊ शकते. मायटोकॉन्ड्रिया बिघडल्याने बिघडलेल्या प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यासाठी ATFS-1 हातभार लावू शकतं.
तसेच उतार वयात होणाऱ्या त्रांसांसाठी देखील हे प्रथिनं उपयुक्त असणार असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे क्वीन्सलँड विद्यापीठाकडून लावण्यात आलेल्या या शोधाचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.