अमरावती : आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकुरांवर गंभीर आरोप केले होते, त्याला यशोमती ठाकूर यांनी जोरदार उत्तरही दिलं. 12 सप्टेंबरला यांच्यातील वादाची पहिली फेरी झाली. आता या यशोमती ठाकूर यांना नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आज खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 2019 मध्ये निवडणुकीत यशोमती ताईंना रवी राणांनी कडक नोटा दिल्या होत्या, चेक दिला असता तर, पुरावा असला असता. पण, कडक नोटा दिल्या आहे, हे लहान मुलांनाही माहिती आहे की याचे पुरावे नसतात. आणि इतकं झोमायचं कारण काय याचा अर्थ जे खरं असतं तेच झोमतं. 


'खरं बोलले म्हणून एवढं झोंबलं'


यावेळी नवनीत राणा यांनी म्हटलं की, ''यशोमती ताई आमच्या ननंदबाई आहे, त्या जे बोलत आहेत. त्या या (अमरावती) जिल्ह्याची मुलगी आहेत आणि मी सून म्हणून एवढी वर्ष इथे काम करत आहे. पण, माझं त्यांना सांगणं आहे की, चेक दिले असते तर तुम्ही पुरावे ठेवून दिले असते. पण, रवीजींनी कडक नोटा दिल्या आहेत. लहान लेकरांनाही माहित आहे की, त्याचे पुरावे नसतात. आणि त्यांना (यशोमती ठाकूर) ही गोष्ट एवढी झोमण्याचं काही कारणंच नाही आहे. मला असं वाटतं आहे की, खरं बोलले म्हणून एवढं झोंबलं. जे खरं होतं ते मी बोलली आणि म्हणून त्यांना झोंबलं. त्यांनी कडक नोट घेतल्या म्हणून त्यांना ते झोंबलं.''


'एकदा हॉस्पिटलमध्ये तपासणी करुन घ्या'


नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना खोचक सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, ''माझा ताईंना एक सल्ला आहे की, माझी ननंदबाई असल्याने मला वहिणी या नात्याने त्यांची काळजी घ्यायलाच लागेल. त्यांनी जाऊन एकदा हॉस्पिटलमध्ये चेकअप करुन घ्या आणि बीपी खूप वाढलेला हे दिसून येत आहे, कारण ज्या पद्धतीची भाषा त्यांनी एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेसाठी वापरली आहे. हे कोणत्याच महिलेला शोभनीय नाही. त्यामुळे जर बीपीची गोळी आणि औषध डॉक्टर पाठवत नसेल, तर मी पाठवते. वहिणी म्हणून हे कर्तव्य मी नक्की पूर्ण करेन.''


नवनीत राणा यांचं यशोमती ठाकूरांना आव्हान


त्यांनी हर्मन्स कंपनी ही त्यांनी आणली आहे. हर्मन्स कंपनी उद्धव ठाकरेजींनी अमरावतीमध्ये आणलेली ही कंपनी आहे. तु्म्ही हर्मन्स कंपनीचे आणि रेमन्स कंपनीचे कागदपत्रे घेऊन या. आम्ही फडणवीसांच्या काळातील कागदपत्रे घेऊन येतो. यावरून कळेल की, या कंपनीच्या नक्की कोणत्या सरकारच्या काळात मतदारसंघात आणल्या गेल्या आहेत. जर आम्ही बोलतोय, ते खरं झालं तर आमच्याऐवजी तुम्हालाच राजकारण सोडावं लागेल, असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.


महत्त्वाच्या संबंधित बातम्या :


Yashomati Thakur : शाहाण्या औकातीत राहा... हराXXX ... पैसे घेतल्याचं सिद्ध करा नाहीतर... ; नवनीत राणांच्या आरोपावर यशोमती ठाकुर भडकल्या