अमरावती : काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) आणि राणा दाम्पत्य यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हं आहेत. राणा दाम्पत्यांनी केलेल्या आरोपांवर आता यशोमती ठाकुर यांनी उत्तर दिलं आहे. गेल्या निवडणुकीत पैसे घेतले असल्याचं सिद्ध करा, मी राजकारण सोडून देते असं आव्हान यशोमती ठाकुर यांनी राणा दाम्पत्याला दिलं. माझ्या बापावर बोलला तर तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. 


ताईंनी कडक नोटा घेतल्या... 


तिवसा या ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांनी थेट यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2019 च्या लोकसभेत ताईंनी आमदार रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला. सगळी मतं ही विरोधकांना दिली, तुम्ही काय इमानदारीची भाषा करताय? अशी जहरी टीका खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर केली. 


यशोमती ठाकुर भडकल्या.. म्हणाल्या


नवनीत राणा यांनी केलेल्या या आरोपांना यशोमती ठाकुर यांनी उत्तर दिलं आहे.  यशोमती ठाकुर यांनी राणा दाम्पत्याला ते सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान दिलं. त्या म्हणाल्या की, "औकातीत राहायचं. माझ्या बापाने आणि आम्ही जमिनी देण्याचं काम केलं आहे, घेण्याचं नाही. निवडणुकीवेळी मी पैसे घेतल्याचं सिद्ध करा नाहीतर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आजगी एखादी निवडणूक आली तर आम्हाला एखादं वावर विकावं लागतंय."


दरम्यान, काँग्रेसची जनसंवाद यात्रा तिवसामध्ये दाखल झाली. त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांचं जेसीबीच्या साहाय्याने फुलांची वृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आलं. 


बच्चू कडूंचा रवी राणांना सल्ला 


आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा प्रयत्न का झाला हे त्यांनी तपासावं. ज्यासाठी हल्ला झाला असेल त्या गोष्टी पुन्हा करू नये असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. आमदार राणा हे संबंधित कार्यकर्त्याला म्हणाले की, तुम्ही यशोमती ठाकूर यांच्या चपला चाटता. हे बोलणं चांगलं आहे का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला. कोणावरी काही पण बोलायचं, त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे असं ते म्हणाले. तसेच आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावर बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी नाव घेऊन बोललं असतं तर मी सांगितलं असतं असं कडू यांनी म्हटलं.


ही बातमी वाचा: