Farmers Agitation : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत. दरात घसरण झाल्यामुळं अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बहिरम इथं शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Agitation) केलं. तब्बल 47 वर्षानंतर बहिरममध्ये कापूस आंदोलनाची ठिणगी पडली. यावेळी शेतकऱ्यांनी कापूस जाळून केला सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी चिंतेत
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दर नसल्यामुळं शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापसाच्या दरात नेमकी कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत. मागील वर्षी 11 ते 12 हजार रुपयांचा असणारा दर 8 ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळं बहिरम येतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कापूस विरोधी धोरणाचा निषेध केला. बहिरम परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी स्वयम् स्फूर्तीनं कापसाचे गाठोळे आणून जाळले. कापसाचे भाव पाडल्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळं त्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केली.
दरात वाढ करा अन्यथा....
केंद्र सरकारने कापसाच्याआयातीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापूस आयात केला आहे. तसेच त्यावरील 11 टक्के आयात शुल्क देखील माफ केले आहे. केंद्र सरकार बड्या कॉटन लॉभीपुढं झुकून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळं जोपर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नाही तोपर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा प्रकाश साबळे यांनी दिला आहे. या प्रसंगी शेकोडो शेतकरी उपस्थित होते.
कापसाच्या कमतरतेमुळं राज्यातील 80 टक्के जिनिंग बंदच
दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतल आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवूण ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत. तर काही 20 टक्के जिनिंग सुरु करण्यात आले होते. तेही आता कापसाच्या अभावी बंद पडले आहेत. कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. राज्यात सुमारे 500 च्यावर जिनिंग आणि त्यात काम करणारे सुमारे 3 लाख मजूर आहेत. ज्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: