Shah Rukh Khan Pathaan : 'मे तेरा हायरे, जबरा, होय रे जबरा फॅन हो गया...'  शाहरुख खानच्या चित्रपटातील हे गाणं त्याच्या चाहत्यासाठी एकदम फीट बसतेय. कोरोना महामारीनंतर किंग खान शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे. त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. कोरोनात बंद झालेली 25 सिंगल स्क्रिन थिएटर सुरु होणार आहेत. सांगलीमध्येही एका चाहत्याने संपूर्ण थिएटर बुक केले आहे. असाच शाहरुखचा एक जबरा फॅन अमरावतीमध्येही आहे. अमरावतीच्या या पठ्ठ्यानं First day first show नव्हे तर संपूर्ण एक शो बुक केला आहे. या चाहत्याची अमरावतीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. 


अमरावतीमधील चांदूररेल्वे येथे शाहरुख खानचे अनेक फॅन्स आहेत. त्यातच या फॅन्सची जोरदार चर्चा होतेय. त्याला जबरा फॅन म्हटलं तर वावगं वाटायला नको. त्याने "पठाण" सिनेमाच्या पहिल्या शो साठी संपूर्ण थिएटर बुक केलं आहे.  शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाऊसफुल होताना दिसतोय. शाहरुखच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील चाहत्यानी चक्क एक शो अख्ख थिएटर बुक केले आहे. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. 


 ‘पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने थिएटरचं बुक केलं आहे. या फॅन क्बलचा फाऊंडर चांदूर रेल्वे शहरातील आशिष उके हा आहे. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी उद्या बुधवारी सकाळी 9 ते 12 वाजताचा शो त्यानं बुक केला आहे. या जबरा फॅनची अमरावतीमध्ये चर्चा सुरु आहे. 


रक्तदान शिबीर, किंग खान म्हणाला... 


किंग खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटासाठी जळगाव (jalgoan) येथील फॅन्सने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे. चक्क पठाण चित्रपटानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या क्लबने त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. 'सर आमच्या जळगाव बॉईजने तुमच्यासाठी खास रक्तदान शिबीर आयोजित केलंय. तुम्ही पाहिलं का?' असं ट्विट करत या फॅन क्लबने शाहरुख खानला ट्विटर वर टॅग केलंय. शाहरुखने सुद्धा या जळगाव फॅन क्लबचा फोटो त्याच्या अकाउंटवर शेयर केलाय. 'खूप सुंदर भावना.. धन्यवाद' असं म्हणत शाहरुखने त्याच्या फॅन क्लबचं कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत. 


बंद पडलेले 25 सिंगल स्क्रिन थिएटर पुन्हा सुरू होणार 


सिनेसृष्टीला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे अनेक थिएटर मालकांनी कोरोनानंतर सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अनेक बिग बजेट सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण आता 'पठाण' सिनेमाने सिनेमागृहांना सुगीचे दिवस दाखवले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने देशभरातील 25 सिंगल स्क्रिन थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. 


जगभरातील 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार 'पठाण'!


'पठाण' हा सिनेमा उद्या जगभरातील 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत 3,91,000 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. शाहरुखचे चाहते तब्बल अडीच हजारात या सिनेमाचं तिकीट विकत घेत आहेत.