अमरावती: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागातील महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनेकजण महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. राज्यातील मुली आणि महिला सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील (Gautami Patil) हिने भाष्य केले. मुलींनो कोणालाही घाबरु नका, बिनधास्त लढा, असा सल्ला गौतमी पाटीलने दिला. गौतमी बुधवारी एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने अमरावतीमध्ये (Amravati) आली होती. यावेळी तिने 'एबीपी माझा'शी संवाद साधला.


गौतमी पाटील हिला राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांबाबत विचारण्यात आले. यावेळी तिने म्हटले की, गेल्या काही दिवसांत आपण महिला अत्याचाराच्या घटना बघितल्या आहेत. इथे बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की, स्वतःची काळजी घ्या. लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा. कुणाच्या दबावाखाली राहू नका, आवर्जून नडा, असे गौतमी पाटीलने म्हटले. तसेच मी राजकारणात अजिबात जाणार नाही, असेही गौतमी पाटीलने स्पष्टपणे सांगितले.  


मी राजकारणात जाणार नाही: गौतमी पाटील


अमरावतीत ही माझी पहिलीच वेळ आहे आणि इथे मिळालेले प्रेम बघून मला खूप बरं वाटले. प्रेक्षकांचं आणि महिला वर्गाचं प्रेम बघून छान वाटलं. मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे, माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मी एक कलाकार आहे. मी कला दाखवते. मी राजकारणात अजिबात जाणार नाही.


गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे यांच्या डान्सची जोरदार चर्चा 


भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात  नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुन विरोधकांनी संदीप धुर्वे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता की,आमचे सर्व तरूण मुले आहेत. जमाव अतिशय मोठा होता. गौतमी पाटील या खूप फेमस आहेत. कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्या सोबत नाचली. उलट शेतकऱ्यांना पीक विमा साठी बैठक लावून एक लाख 98 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळून दिला. इ पीक पाहणीचे अट रद्द केली. नुकसानीची पहिले पंचनामे करण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्ष फक्त राजकारण करत आहे, असे उत्तर संदीप धुर्वे यांनी दिले.


आणखी वाचा


Sandhya Sawalakhe : दादा, 'यांच्यापैकी' एकाचं लिंग कापा म्हणजे गुलाबी कपडे घालण्याची वेळ येणार नाही : संध्या सव्वालाखे