अमरावती: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरातील वातावरण तापले असताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असे बोंडे (Anil Bonde) यांनी म्हटले. ते रविवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमरावतीत रविवारी भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना डिवचणारे वक्तव्य केले. त्यामुळे आता बोंडे विरुद्ध जरांगे वाद पेटण्याची शक्यता आहे. रक्ताची नातं असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होईल. पण सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री झाले तरी ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले.
पुण्यात झळकले 'भावी मुख्यमंत्री जरांगे' आशयाचे बॅनर्स
पुण्यातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत 'भावी मुख्यमंत्री'चे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. 'मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री' असा आशय असलेले पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्याचे दिसले. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली. मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा देत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. रॅलीला सारसबाग चौकातून सुरूवात होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. त्यांनी हातात भावी मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर हाती घेतल्याचे दिसून आले.
दाढी राखणं मर्दाचं लक्षण; मनोज जरांगेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे आणि राणे कुटुंबीय आमनेसामने आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी माझ्या दाढीवर नाही, सगळ्याच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. सगळ्या दाढी राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला. दाढी ठेवणं हे मर्दाचं लक्षण आहे. मी त्यांचा आदर करतो. ते आता फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत, अशा खोचक शब्दांत जरांगे पाटलांनी राणेंना प्रत्युत्तर दिले.
आणखी वाचा
विधानसभेला कोणते 113 आमदार पाडणार? मनोज जरांगे पाटलांनी थेटच सांगितलं, म्हणाले...