Manoj Jarange Patil : पहिल्या दिवसापासून आमची ओबीसीमधून (OBC) मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका असल्याचे मत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं. मराठा आणि कुणबी एकच आहे. आमची मागणी आर्थिक निकष नाही. आमचे हक्काचे आहे ते द्या असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा पूर्वीपासून ओबीसीमध्येच आहे, त्याला आर्थिक निकषाकडे जाण्याची काय गरज? असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. विधानसभेला कोणते 113 आमदार पाडणार हे आत्ताच सांगणार नाही. पण लवकरच कोण आहेत ते सांगणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पण नवीन येणारे 113 आमदार आमचे असतील असेही जरांगे म्हणाले. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आम्ही त्यांची वाटच लावणार असल्याचे पाटील म्हणाले.
मला माझा समाज आणि समाजाची मुलं मोठी करायची आहेत
आरक्षण देणार नसतील तर आम्हाला भूमिका घ्यावी लागेल असे जरांगे पाटील म्हणाले. मला माझा समाज आणि समाजाची मुलं मोठी करायची आहेत. भाजपमधीस सर्वसामान्य मराठ्यांना देखील वाटत आहे की, आपण ज्या आमदारांना मोठं केलं ते आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत असे जरांगे पाटील म्हणाले. जेव्हा आमदार पडतील तेव्हाच त्यांना जातीची किंमत कळेल असे जरांगे पाटील म्हणाले. मी नारायण राणेंना दादा म्हणतो, पण त्यांनी फडणवीसांचा कासरा हातात घेतल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी अति संयमाने घेत आहे. मी जमिनीवरच वागत आहे. एवढी पल्बिक असतानाही मी मस्तीत आलो नाही जमिनीवरच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळं मी कधीच मोठा आहे असं म्हणालो नाही असे जरांगे पाटील म्हणाले. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आम्ही त्यांची वाटच लावणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्या बाजून कोणी नाही.
आरक्षण देणार नसतील तर पु्न्हा मुंबईला जाऊ
आरक्षण देणार नसतील तर पु्न्हा मुंबईला जाऊ असंही जरांगे पाटील म्हणाले. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही. पण बाकीच्यांना आरक्षणाची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. गोरगरीब जनतेला आरक्षणाची गरज असल्याचे जरांगे म्हणाले. सध्या आपलं कुठेही आंदोलन सुरु नाही. त्यामुळं कोणालाही अडवू नका. आपण मुंबईत जाऊन नेत्यांना जाब विचारु असेही जरांगे पाटील म्हणाले. राज्यात कोणत्याही दंगली होणार नाहीत असे जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीसांना मराठेच मराठ्यांच्या अंगावर घालायचेत
सगळ्या दाडी राखणाऱ्यांवर नितेश राणेंनी आक्षेप घेतला असेल. सगळी दाडी राखाणाऱ्याबद्दल अखाद्याला चीड असते. कारण दाडी राखणे मर्दाचे लक्षण असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी त्यांना उत्तर देत नाही. पण त्यांना सन्मान शब्दाचा अर्थ समजत नाही असेही जरांगे म्हणाले. ते बोलतेत ते त्यांचे शब्द नाहीत, ते शब्द देवेंद्र फडणवीसांचे आहेत. फडणवीसांना मराठेच मराठ्यांच्या अंगावर घालायचे आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले.
नियोजीत सगळे कार्यक्रम होणार
माझी तब्बेत आता चांगली आहे. त्यामुळं नियोजीत सगळे कार्यक्रम होणार आहे. आज पुणे, उद्या नगर आणि परवा नाशिकमध्ये शांतता रॅली होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मराठे संपले पाहिजेत यासाठी प्रविण दरेकर यांनी अभियान राबवलं आहे. माझ्याविरोधात आणि मराठा समाजाच्या विरोधात फडणवीसांनी षडयंत्र आणि सापळा रचल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते आमचेच लोक फोडून पत्रकार परिषदा घ्यायला लावत आहेत. आंदोलन करत आहेत. हे फडणवीसांचे काम आहे.
महत्वाच्या बातम्या:
'दाढी राखणं मर्दाचं लक्षण', मनोज जरांगेंचे नितेश राणेंना प्रत्यूत्तर, म्हणाले, "फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत.."