अमरावती : प्रहार (Prahar) संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी अमरावतीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आमचा वारंवार अपमानीत केलेल्या नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.


बच्चू कडू महायुतीतच, फक्त अमरावतीत स्वतंत्र लढणार


बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे की, राणांनी आम्हांला वारंवार अपमानीत केलं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करण्याची मानसिकता नाही. आघाडीची उमेदवारी मागा पण, राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. सातत्याने कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली असून पक्ष सोडण्याची भावनाही व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. चांगल्या उमेदवाराच्या आम्ही शोधात होतो. आम्हांला भाजपमधीलच चांगला उमेदवार सापडला आहे.


3 तारखेला उमेदवारी जाहीर करु


भाजपमधीलही काही कार्यकर्ते नाराज आहेत, ज्यांना मोदीजी हवे पण, राणा नको. असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. यामुळे आम्ही बांधणी केली आहे. सर्वपक्षीय नाराज उमेदवारांचा फायदा आम्हाला होईल. अमरावतीमधील उमेदवारीचा निर्णय घेतला. आता 3 तारखेला अर्ज दाखल करु, असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं आहे.


अमरावतीत स्वतंत्र उमेदवार देण्याचं कारण काय?


महायुतीविरोधात स्वतंत्र उमेदवार उभा करण्यामागचं प्रमुख कारण राणांवर असलेली नाराजी आहेच, पण त्याशिवाय भाजपची भूमिका आणि राणांबद्दलच अतिप्रेम कार्यकर्त्यांना अमान्य आहे. आमचे दोन आमदार आणि आमची ताकद असताना आम्हाला न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणे, हे चुकीचं आहे. ज्याच्या घरी जेवण आहे, त्यानेच रंगबाजी करुन जेवण घालावं, हे कुणी ऐकणार नाही, आमचा तसा स्वभाव नाही, असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे.


मित्र पक्षांना चुकीची वागणूक 


आम्ही घटक पक्ष असताना भाजपकडून मित्र पक्षाला मिळालेली वागणूक फार द्वेष आणणारी आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते बोलायला तयार नाही. अमरावती जिल्ह्यातील विमानतळाचा प्रश्न, शेतीमाल असे, अनेक प्रश्न अद्याप निर्णय नाही, सरकार यावर निर्णय घेत नसेल, तर याच्या विरोधात लढलो पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bacchu Kadu On Amravati: भाजपचा नेता गळाला की ठाकरेंचा पळविला, बच्चू कडू अमरावतीतून कोणाला उतरवणार? नवी माहिती समोर