अमरावती : घर तिथे वाहन ही शहरी भागात नव्याने अस्तित्वात येणारी ओळख तयार झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीमार्फत नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वाहन नोंदणी वरून दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीकर सार्वजनिक वाहतुकीऐवजी खाजगी वाहनांना पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनांच्या संख्येत कोणती वाहने अमरावतीकरांच्या (Amravati News) पसंतीस उतरली आहे जाणून घेऊ या.


वाहनाच्या संख्येत दोन लाखापेक्षा जास्त वाढ


कुटुंबाकडे आवश्यक गरज म्हणून वाहनाकडे पाहिले जात आहे. अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत खाजगी आणि व्यावसायिक वाहनाच्या संख्येत दोन लाखापेक्षा जास्त वाढ झालेली आहे. 2018 मध्ये वाहनाचा आकडा 7 लाख 3 हजार 464 होता तर 2023 च्या जून अखेर पर्यंत तो वाढून तब्बल 9 लाख 33 हजार 962 पर्यंत पोहचला आहे.  2018-19 ते जून 2023 अखेर 2 लाख 30 हजार 458  वाहनाची नव्याने पाच वर्षात भर पडलेली आहे.


पाच वर्षात या वाहनांची पडली भर (2018 ते जून 2023)



  • दुचाकी -   177975

  •  कार,जीप - 22678

  •  ऑटो रिक्षा -  4265

  •  मिनीबस-  96

  • स्कूल बस-  140

  •  ट्रक,लोरी-  2717

  •  तीन चाकी - चार चाकी-  3978

  • ट्रॅक्टर-   7578

  •  ट्रॉली - 1535

  • ॲम्बुलन्स -  103

  •  इ-रिक्षा (पब्लिक अँड गुड्स)-83

  • लक्झरी टुरिस्ट बस-61

  • टॅक्सी-61

  • इतर वाहने - 748


वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ


 2018 मध्ये अमरावती जिल्ह्यात 6 लाख 59 हजार 355 दुचाकी व इतर चार चाकी वाहने होती.2020 ते 2022 या दोन वर्षात वाहन खरेदी सर्वसाधारण असल्याचे दिसून येते. मात्र त्यानंतर वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अमरावती जिल्ह्यात जून 2023 अखेरपर्यंत एकूण 9 लाख 33 हजार 962 वाहने वाढली आहे.


वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत


अमरावतीकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर दिला आहे.  2022-23 या वर्षात दुचाकी 34 हजार 66, चरचाकी वाहने 5202 
वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.अमरावती शहरातील नागरिकांचा वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत आहे. अमरावती शहरातील वाहनांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. मग वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च अमरावतीकर करत आहेत. गेल्‍या काही वर्षात डिझेल, पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या इंधनाच्या दराने शंभरी गाठली आहे.


इतर महत्त्वांच्या बातम्या :                          


Thane News : ना लायसन्स, ना परवानगी; नो पार्किंगच्या गाड्या उचलणाऱ्या चालकांकडूनच नियमांची पायलमल्ली? ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस