Ravi Rana, Amravati Dahi Handi : एक, दोन, तीन, चार, पाच अशा थरांचा थरार या दहीहंडी उत्सवात (Dahi Handi 2022) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. कारण कोरोना निर्बंधाच्या (Covid19) विघ्नात अडकलेला दहीहंडी उत्सव(Dahi Handi 2022) यंदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यभरात दहीहंडीची (Dahi Handi 2022)  तयारी जोरदार सुरु आहे. आमदार रवी राणा यांनीही दहीहंडीचा मेगाप्लान केला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis )यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, त्याशिवाय दहीहंडीला रविना टंडन, शक्ती कपूर, कार्तिक आर्यन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. 


आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरीय दहीहंडीचा (Dahi Handi 2022) मेगाप्लान तयार झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) यांची रक्ततुला देखील करण्यात येणार आहे. सोबतच या दहीहंडी कार्यक्रमाला सिने अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री रविना टंडन, शक्ती कपूर, तुषार कपूर आणि कृष्णा यांची उपस्थिती राहणार आहे.


दरवर्षीप्रमाणे विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी (Dahi Handi 2022) म्हणून नावलौकिक असलेली अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी येणाऱ्या रविवारी 21 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. अमरावतीच्या नवाथे चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार आहे. याशिवाय या दहीहंडी कार्यक्रमाला सिने अभिनेता कार्तिक आर्यन, शक्ती कपूर, तुषार कपूर, कृष्णा आणि अभिनेत्री रविना टंडन यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्षानी दिली. यासह कृष्ण वेशभूषा स्पर्धा आणि विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकाना लाखो रुपयांची भरघोस बक्षीस देखील देण्यात येणार आहेत.. ही दहीहंडी अमरावती, अचलपूर आणि मेळघाट मधील धारणी येथे होणार आहे. 




कोरोनामुळे 2 वर्षाचे खंडित कालावधीनंतर होणाऱ्या या दहीहंडीची प्रतिक्षा - 


अमरावतीकरांच्या साक्षीने 'गोविंदा आला रे आला'च्या जयघोषात साजरा होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाची विदर्भवासीयांना आतुरतेने प्रतीक्षा असते. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या या अदभुत, अविस्मरणीय आणि ऐतिहासिक दहिहंडीस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः उपस्थित राहणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात सहभागी होणारे सर्व गोविंदा पथक आधी आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाला सलामी देणार आणि मगच थर रचणार असल्याने देशभक्तीचा महाकुंभ नागरिकांना अनुभवता येणार आहे. रविवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्थानिक सिदार्थ मंगलम येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला आणि सत्कार समारंभ आयोजित केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहीहंडीसोबतच रक्तदान व रक्ततुला असे आयोजन राणा यांच्या संकल्पनेतून आयोजित होत आहे. 


दहीहंडीची भव्य तयारी 
या दहीहंडीसाठी सर्व रीतसर परवानग्या घेऊन 40 × 60 फुटाचा भव्य स्टेज, कर्णमधुर डॉल्बी सिस्टिम यंत्रणा, 29 फूट उंच हंडी, बालगोपाल कृष्ण सजावट स्पर्धा, आणि नृत्य स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित आसन व्यवस्था असणार आहे..


प्रत्येक गोविंदा पथकाला विशेष पारितोषिक - 
दरवर्षीप्रमाणे यंदाही नामवंत सिनेकलाकार उपस्थित राहणार असून नागरिकांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. या ठिकाणी नागरिकांना सहज सुलभ पद्धतीने कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी भव्य दिव्य स्टेज उभारण्यात येणार असून विदर्भातील नामवंत गोविंदा पथके आपली उपस्थिती दर्शविणार आहेत, प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या गोविंदा पथकाला 51 हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या गोविंदा पथकाला 31 हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला विशेष पारितोषिक देण्यात येईल, बालगोपालांसाठी कृष्ण वेशभूषा स्पर्धा आणि विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभागी होणारयांना ही आकर्षक बक्षिसे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे हस्ते प्रदान करण्यात येतील..