Amravati Crime अमरावती : तवेवाला बाबा म्हणून नावारुपास आलेला भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर अखेर पोलिसांच्या (Amravati Police) ताब्यात आला असून पोलिसांनी त्याला भोपाल येथून अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातील (Amravati) तिवसा (Tivsa) तालुक्यात असलेल्या मार्डी येथील आश्रमात या भोंदू बाबाने भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तीचे सतत लैंगिक शोषण केले होते. दरम्यान पीडित महिलेने 25 जानेवारीला कुऱ्हा पोलीस (Amravati Police) स्टेशन गाठत या बाबा विरोधात तक्रार (Amravati News) केल्याने हा धक्कादायक प्रकार सामोर आला. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत या बाबाचा शोध सुरू केला. मात्र त्यापूर्वीच या बाबाने पळ ठोकत पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर पोलिसांनी विशेष पथक नेमुन या बाबाला अटक केली आहे.
तीन महीने महिलेवर बलात्कार
तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा अल्पावधीतच प्रसिद्ध झाला होता. आपल्या समस्या सोडूवून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदासबाबांच्या आश्रमात येत असे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी अशीच एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा, या अपेक्षेने समाधान शोधत होती. दरम्यान, हा गुरुदासबाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो, असे तिला सांगण्यात आले होते.
मार्च 2023 दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी येथे गुरुदासबाबाच्या आश्रमात आली. तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली. त्यानंतर भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच या महिलेवर तीन महीने सतत बलात्कार केला.
अश्लील चित्रफीत तयार करत वारंवार अत्याचार
पिडीत महिलेने भोंदू गुरुदास बाबाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 25 जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशन मध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हा भोंदूबाबा आपल्या आश्रमातून रफू चक्कर झाला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या बाबाने महिलेची अश्लील चित्रफीत सुद्धा केली असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. भोंदूबाबाने पिडितेला धमकी ही दिली की, या बाबत बाहेर कुणाला सांगितले तर जिवाशी मारू. आपल्या पतीची तब्बेत बरोबर राहत नाही, पतीचा आजार बरा व्हावा यासाठी सुनील कावलकर या भोंदू बाबाकडे ती पिडीत आली होती. मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला.
भोंदू बाबाला भोपाळ येथून अटक
अखेर काल 8 जानेवारीच्या रात्री पोलीसांनी मोठ्या शिताफीने या बाबाला मध्यप्रदेश मधील भोपाळ येथून अटक केली. हा बाबा एका लॉज मध्ये असल्याची माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. सद्या भोंदूबाबाला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिसांना आपली ओळख पटू नये यासाठी भोंदूबाबाने आपला पूर्ण लूक बदलवत आपली दाढी आणि कटींग केली होती. दरम्यान भोंदूबाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का? याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Amravati Accident : अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; चालकासह सहा जनावरांचा मृत्यू