Amravati News : दर्यापूर ते अकोला (Akola) मार्गावरील गोळेगाव फाट्याजवळ अवैध जनावरे (Cow Smuggling)  घेऊन जाताना वाहन उलटून अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात वाहन चालकासह वाहनातील सहा जनावरांचाही मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने वाहन असल्याने टायर फुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृतक चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून वाहनाला जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आलं. घटनेचे माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि  या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे.


वाहन चालकासह 6 जनावरांचा मृत्यू


या दुर्दैवी घटनेनंतर दर्यापूर ते अकोला मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अवैध जनावरांच्या वाहुतुकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  अशातच दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जखमी जनावरांवर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेत वाहन चालकासह निष्पाप 6 जनावरांचा मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  


समृद्धी महामार्गावर गायींची तस्करी


काही दिवसांपूर्वीच  समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करीचं प्रकरण समोर आलं होत. वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या. या घटनेनंतर महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जात आहे का? असा प्रश्न  उपस्थित होत आहे.समृद्धी महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक 29 जानेवारीच्या दुपारी साडे बाराच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना दिसून आला. त्यामुळे वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू करताच तो ट्रक आणखी जास्त वेगानेने पळू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. 


पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला. त्याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला. त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. अनेक वाहन पाठलाग करत असताना  त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले. हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिन्ही लोक पडून गेले. जेव्हा पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. 


इतर महत्वाच्या बातम्या