Amravati Crime News: वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कॉल करून शेअरमार्केट, क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली दीड कोटींची सायबर फसवणूक (cyber fraud) करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 5 आरोपी गजाआड झाले आहेत. अमरावती सायबर पोलीस ( Amravati cyber police station) ठाण्यात याबाबत एका दाम्पत्याने तक्रार दिली. 


वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून तुम्ही ४ कोटी रुपये कमवले असे सांगत ते पैसे काढण्यासाठी टीडीएस आणि इतर कारणाने तब्ब्ल १ कोटी ५३ लाख ७७ हजार ८२४ रुपये या टोळीने ट्रान्सफर केले. वारंवार पैसे परत मागूनही कोणतेच उत्तर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांनर त्यांनी अमरावती पोलीस ठाण्यात याबाबत २७ जून रोजी तक्रार दिली.


पोलिसांना हाती लागले सायबर चोरांचे मोठे रॅकेट


या फसवणूकीत वेगवेगळ्या कोणत्या बँक खात्यात किती पैसे ट्रान्सफर झाले याची पोलीसांनी चौकशी केली असता अमरावतीच्या एका तरूणीच्या बँक खात्यात ४२ लाख रुपये टाकल्याचे लक्षात आले. यानंतर तरुणीची चौकशी केली तेंव्हा पोलिसांना सायबर चोरांचे मोठे रॅकेट हाती लागले. या तरुणीसही पोलीसांनी अटक केली.


पाच आरोपींजवळचा ऐवज जप्त


पोलिसांच्या तपासात उघड झालं की, अमरावती येथील या तरुणीला अकाऊंटसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून अकाऊंट बनवून देण्यात आले. हे अकाउंट गुन्ह्यातील मुख्य आरोपी यांना देऊन संबंधित बँक अकाउंटचे डिटेल्स आणि चेक बुक, एटीएम कार्ड वापरण्यासाठी दिले. अशा एकूण पाच आरोपींना ताब्यात घेऊन यांच्याकडे विविध बँकेचे अकाउंटचे चेकबुक, एटीएम, सिमकार्ड, एसडी कार्ड, तसच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.


या आरोपींनी 42 लाख रुपये गुजरात कोटक महिंद्रा बँक, हैदराबाद बंधन बँक, फेडरल बँक गुजरात, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा अशा 14 बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले तर उर्वरित फसवणुकीची रक्कम ही एकूण 216 बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली असून आतापर्यंत 7 लाख 45 हजार फ्रीज करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिली.


हेही वाचा:


जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू