Honey Village : महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळील आमझरी येथे भेट देऊन विदर्भातील पहिले मधाचे गाव‌ आमझरी म्हणून जाहीर केले.. महाराष्ट्रातील मधाचे गाव म्हणून संकल्पना राबविण्यात येत आहे. विदर्भातील पहिले तर राज्यातील दूसरे आमझरी मधाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. विदर्भातील नंदनवन असलेल्या पर्यटन स्थळ केंद्र बिंदू ठरवून राज्यातील मधाचे दूसरे गाव आमझरी निसर्ग पर्यटन संकूल येथे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर, यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ अधिकारी प्रदीप चेचरे यांनी प्रास्तावित 'हनी व्हिलेज' ला रोजगार युक्त बनविण्यासाठी राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. 


अमरावती मेळघाट भागातील जंगली मधाला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे या गावाची निवड करण्यात आली आहे. या गावामध्ये स्फुर्ती क्लस्टरच्या माध्यमातून शिवप्रभू संस्थेद्वारे आदिवासी महिला आणि यूवकांना रोजगार मिळावा, म्हणून सामान्य सुविधा केंद्रामार्फत मधाचे शूद्धीकरण, पॅकेजिंग आणि वितरण सुविधा शहापूर येथे शुक्ष्म लघू आणि उद्यम मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या केंद्राची सुविधा आमझरी गावास मिळत असल्याने उपलब्ध झालेल्या रोजगा-याच्या संधीचे सोने करुन आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी केले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी मधाचे गावाची संकल्पना विशद करून उपस्थित वनव्यवस्थापन समिती सदस्यांना पूढाकार घेण्याचे आवाहन केले. समिती अध्यक्ष गोपिधिकार यांनी समितीच्या वतीने मधाचे गाव आमझरी जाहीर केल्याबद्दल अंशू सिन्हा यांचा गावाच्या वतीने सत्कार केला. स्फुर्ती क्लस्टरच्या वतीने संचालक सुनील भालेराव यांनी मधाच्या उपपदार्थ निर्मिती वर भर देण्यात यावा, यासाठी शासकीय योजनाचे उपक्रम सदर गावात राबविण्याचा प्रस्ताव सादर केला.




मधमाशा विविध प्रजाती संगोपन आणि मध संकलन‌ याबाबत स्फुर्ती क्लस्टरचे सहयोगी संचालक विद्यानंद अहिरे आणि युवराज वाघ सचिव शिवप्रभू संस्था यांनी मांडले. मेळघाटातील मधमाशा आणि मधसंकलन‌ या विषयाचे अभ्यासक शिपना महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विजय मंगळे यांनी मेळघाटातील फुलांच्या प्रजाती आणि त्यापासून होणारे मधसंकलन या विषयावर भुमिका विशद करुन मेळघाटातील रोजगार निर्मितीचे साधन मधसंकलन होऊ शकते. तसेच येथील गोळा झालेला मध हा उच्च दर्जाचा असल्याने अधिक दर मिळू शकतो, असे सांगितले. स्फुर्ती क्लस्टरला भेट मधासोबत दूधाचे ही गावं व्हावे. या संकल्पनेसाठी खवा निर्मिती करणारा शेतकरी आदिवासी महिला बचत गटांनी सादर केले. जिल्हाधिकारी यांचेकडील प्रस्ताव मंजूर करावा यासाठी स्फुर्ती हनी आणि खवा क्लस्टरला भेट दिली असता महिला समभाग धारकांद्वारे ही मागणी करण्यात आली.


आग्या मधमाशांचे शास्त्रोक्त पद्धतीने मध काढण्यासाठी साहित्य किट वाटप करण्यात आले. स्फुर्ती क्लस्टर आणि शिवप्रभू संस्थेद्वारे अगरबत्ती प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिला बचत गटांना प्रशिक्षण प्रमाणपत्र अंशू सिन्हा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विदर्भातील पहिले मधाचे गाव अमरावती जिल्ह्यात आमझरी जाहीर झाल्याने मेळघाटात चिखलदरा येथे पर्यटकांना शुद्ध मध चाखावसास मिळणार हे विशेष.