Navneet Rana Letter News: खासदार नवनीत राणा यांना सावधगिरीचा इशारा देणारं पत्र समोर आले आहे. या पत्रात राणा यांना धोका असल्याची सूचना देण्यात आली आहे. हे पत्र मुस्लिम समाजातील एका शासकीय कर्मचाऱ्याने लिहिल्याचे समजते आहे. यावरच आता नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, मला कितीही धमक्या मिळाल्या तरी मी लढत राहणार. हे पत्रात एका  


ज्या व्यक्तीने त्यांना हे सूचना देणारे पत्र लिहिले आहे, ''त्याबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, ज्यांनी हे पत्र लिहिलं आहे, त्यात त्यांनी लिहिलं आहे की ते शासकीय कर्मचारी आहेत. मी त्यांची बदली करून अमरावतीत आणलं. तसेच कोरोना काळात त्यांच्या वडिलांची आपण मदत केली, असं ते पत्रातून सांगत आहेत. कोरोना काळात मी शेकडो लोकांना मदत केली. त्यावेळी सर्वांची ही जबाबदारी होती. या पत्रात ते प्रार्थना करत आहेत की, मी अल्लाहशी प्रार्थना कारेन करतो की तुमच्या जीवाला कोणत्याही धोका होऊ नये. मी तुमचा हितचिंतक असून मला तुम्हाला सांगायचं आहे की, काही लोक राजस्थानवरून निघाले आहेत. ते इथे आले आहेत. त्यांनी तुमच्या घराची पाहणी देखील केली आहे.'' दरम्यान राणा यांनी या पत्राची तक्रार पोलिसात केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटज तपासत असल्याचं त्यांनी सागितलं.  


राणा पुढे म्हणाल्या की, ''या सर्व प्रकरणात मला धमकी देण्याचे काम कोण करू शकतं? हे कशामुळे झालं? याप्रकरणी माझा जो अंदाज आहे, त्यानुसार मागे जे कोल्हे प्रकरण झालं आणि त्याआधी हिंदू-मुस्लीम दंगल अमरावतीत झाली होती. त्यात मी खूप तटस्थपणे माझे जे विचार होते, त्याला धरून मी मैदानात लढली होती. तसेच कोल्हे यांच्या प्रकरणी मी अमित शाह यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. कारण चोरीचे प्रकरण म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. यासर्व गोष्टी याशीच संबंधित असल्याचं मला वाटत आहे. याप्रकरणी योग्य पद्धतीने तपास केल्यास यामागील मोठी नावे समोर येऊ शकतात.''     


तुम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, ''महिला उघडपणे येऊन बोलते, तेव्हा एक भीती असते, माझी मुलं आहे. माझं कुटुंब आहे. ती भीती मलाही आहे. कारण मुसेवालाचे जे प्रकरण झालं. त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. तेही कधी थांबले नव्हते. त्यांना जे बोलायचे होते, ते मुसेवाला बोलत होते. म्हणून त्यांच्यासोबत अशी घटना घडली. माझ्यासोबतही तोच विषय आहे.''  त्या म्हणाल्या की, धमक्या कितीही दिल्या तरी मी लढत राहणार आणि माझे विषय मांडत राहणार.  


संबंधित बातमी: 


'तुमच्यावर लोकं पाळत ठेवून'; खासदार नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र; सरकारी अधिकाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती