एक्स्प्लोर

कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेत तुफान राडा

चित्रपटातली फायटिंग खऱ्या आयुष्यात झाली. तर जसं होईल अगदी तसंच चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत यावर्षीही झालं. कोल्हापुरातल्या लोकांना तसं या सभेतल्या राड्याचं नवल नसेलही. पण चित्रपट महामंडळाच्या सभेत घडलेल्या या प्रकाराची चर्चा होत आहे.

कोल्हापूर : चित्रपटातली फायटिंग खऱ्या आयुष्यात झाली. तर जसं होईल अगदी तसंच चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत यावर्षीही झालं. कोल्हापुरातल्या लोकांना तसं या सभेतल्या राड्याचं नवल नसेलही. पण चित्रपट महामंडळाच्या सभेत घडलेल्या या प्रकाराची चर्चा होत आहे. विरोधकांनी जुनं प्रकरण उकरून काढलं. विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार मागे घेतल्याशिवाय सभा सुरुच करु देणार नाही अशी धमकी माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी दिली. मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा पुढे रेटली. त्यावरुन विरोधक पुन्हा भडकले आणि अध्यक्षांनी थेट लंचब्रेक घेतला. जसं जेवण उरकलं तसा विरोधकांना पुन्हा चेव चढला. आणि मग कागदांची फेकाफेकी सुरु झाली. मग बिगबॉसचे राडाफेम सुशांत शेलार यांचाही धीर सुटला आणि तेही हमरीतुमरीवर उतरले. शेवटी तीन तासांच्या राड्यानंतर एकापाठोपाठ प्रस्ताव ठेवले. आणि एकच 'मंजूर मंजूर मंजूर' अशी घोषणा झाली. सभेला सुरुवात होण्यापूर्वी अध्यक्षांच्या प्रास्ताविकाआधीच काही सभासदांनी हा गोंधळ घातला. यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. वार्षिक कामांचा आणि भावी योजनांचा आढावा घेतल्यानंतर सभेचे अध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जेवणाच्या विश्रांतीनंतर अर्ध्या तासाने सभा घेण्यात येईल अशी घोषणा केली. अद्याप केवळ एक वाजला असताना भोजनासाठी वेळ घालवण्यापेक्षा कामकाज पुढे सुरू ठेवावे, अशी घोषणाबाजी काही सभासदांनी केली. संचालक सुशांत शेलार यांनी नियमावलीप्रमाणे कामकाज होईल, असे सांगितले. दरम्यान, राजेभोसले सभागृहातून भोजनकक्षाकडे जात असताना त्यांना सभासदांनी घेराव घातला. त्यांना सभा सुरू ठेवण्याचा एकच आग्रह केला. संचालक सतीश रणदिवे, अभिनेत्री संचालिका वर्षा उसगावकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी सभासदांनी सभा सुरू करा अशा घोषणा सुरूच ठेवल्या त्यामुळे अखेर राजेभोसले पुन्हा मंचावर आले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सभासदांना खाली जाण्यास सांगितले. यानंतर सभा सुरू झाली. वादाचे मूळ काय? एका अभिनेत्रीने माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकाल लागल्यावर गेल्या आठवडात अष्टेकर यांनी या प्रकाराविरोधात ती अभिनेत्री, अर्जुन नलवडे आणि सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात 25 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीच्या दाव्यासोबत फौजदारी गुन्हा नोंद केल्याचे सांगितले होते. विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अष्टेकरांच्या अभिनंदनाचा तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्या तिघांच्या निषेधाचा फलक येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर काहींनी लावला होता. अष्टेकर यांनीच हा फलक लावून महामंडळ कार्यकारिणीची बदनामी केली असे म्हणत त्यांना महामंडळाने नोटीस लागू केली. या नोटीस प्रकरणाचा जाब आणि त्यावरून महामंडळाने केलेली कारवाई यावरून आज सभेत वाद पेटला.

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
नेरुळच्या रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना,  कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
नेरुळच्या रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना,  कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
Pune Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!
मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget