Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील (Badlapur School Crime News) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालातून या प्रकरणी  खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेंचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटरचा दावा हा संशयास्पद असल्याचे तपासात पुढे आले आहे. किंबहुना अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचेही यातून पुढे आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालाचे  न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असून यातील पाच प्रमुख मुद्दे काय हे समजून घेऊ.  


चौकशी अहवालातील 5 मोठे मुद्दे!


1) बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील (Badlapur School Crime News) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारीच जबाबदार आहेत. 


2) बंदुकीवर अक्षयच्या हाथाचे ठसे नाहीत, अक्षयच्या पायावर गोळी न झाडता, डोक्यात गोळी का घातली?


3) स्वरंक्षणासाठी एन्काऊंटर केला हा पोलिसांचा दावा संशयास्पद. 


4) एन्काऊंटर फेक आहे हा अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे,


5) याप्रकरणी आता FIR दाखल होईल, एन्काऊंटर करणाऱ्या 5 पोलिसांवर खटला चालवा


चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका!


पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सर्वप्रथम पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल होईल. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला चालवला जाईल. त्यामुळे आता याप्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस दल आणि राज्य सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर याप्रकरणी पाच पोलीस सोबत असताना आणि अक्षय शिंदे एकटा असताना त्यावर पोलिसांना आवर घालता आला नाही का? यावर देखील या चौकशी अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सोबतच या घटनेत वापरण्यात आलेल्या बंदुकीवर देखील अक्षय शिंदेच्या  हाताच्या बोटांचे ठसे पूर्णपणे दिसून आलेले नाही. किंबहुना पाच पोलीस कर्मचारी असताना देखील अक्षय शिंदे कसा काय पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यात गोळीबार करण्यात आला हे कसं काय शक्य होऊ शकतं? असे प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित करण्यात आले आहे. या घटनेचा संपूर्ण अहवाल तीन वाजताच्या सुमारास पुढे येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.


अक्षय शिंदे चा एन्काऊंटर करणारे पोलीस कोण? 



  •  पोलीस निरीक्षक संजय शिंदे

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे

  • पोलीस हवालदार अभिजीत मोरे

  • पोलीस हवालदार हरीश तावडे


इतर महत्वाच्या बातम्या