Mangal Nakshatra Parivartan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सौरमालेतील सर्व ग्रह एका ठराविक कालावधीसाठी राशी परिवर्तन करतात. या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. सध्या मंगळ ग्रह तब्बल 50 वर्षांनंतर शनीच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे शुभ मंगळ-पुष्य योग निर्माण झाला आहे. याचा शुभ प्रभाव 3 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.32 वाजता शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याच्या प्रभावाने तुम्हाला नोकरी व्यवसायात चांगल्या संधी निर्माण होतील. तसेच, तुमची अनेक कामेही पूर्ण होतील. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊयात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या सोकांसाठी मंगळ ग्रहाचं शनीच्या नक्षत्र होणं फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात मोठी डील हाती लागू शकते. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जोडीदाराबरोबरचा काळ तुमचा आनंदात जाईल. तसेच, तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. शुभ कार्य हाती घेऊ शकता. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला ठरणार आहे. जे लोक नोकरी करतायत त्यांना मंगळ-पुष्य योगाने नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आखू शकता. तसेच, नवीन व्यवसायाची सुरुवातही करु शकता. 


मीन रास (Pisces Horoscope)


मंगळ ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मीन राशीच्या व्यवसायात फार मोठा बदल दिसून येणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामात अगदी व्यस असाल. तुमच्या खर्चात वाढ होईल. मात्र, तुमचे उत्पन्न चांगले असल्यामुळे तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्नॉपर्टी घेऊ इच्छिता तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                           


Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशिबाला मिळणार कलाटणी, होणार अपार धनलाभ