Akola Crime News: अकोला : अकोल्यातील (Akola News) रतनलाल प्लॉट चौकातील (Ratanlal Plot Chauk) जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ काही नवजात अर्भकांचे मृतदेह आढळून आले आहेत. जिल्हा परिषद उर्दू शाळा ही जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. एकाच वेळी चार नवजात अर्भकांचे मृतदेह (Crime News) आढळून आल्यानं खळबळ संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 


जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर अर्भकांचे मृतदेह आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेच्या छतावर हे मृतदेह कुठून आले? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 


"वैद्यकीय अहवालानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल"


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "जिल्हा परिषद शाळेल्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल." दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारात चार अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, पोलिसांनी सांगितल्यानुसार, एकच मृतदेह  असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


जिल्हा परिषद उर्दू शाळा अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकात आहे. हे ठिकाण गजबजलेलं आणि वर्दळीचं आहे. या शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. 


मुलं पुरती घाबरुन गेली आणि त्यांनी तिथे जवळच राहणाऱ्या काही लोकांशी संपर्क साधला. लोकांनी या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे. तसेच, सापडलेलं अर्भक स्त्री अर्भक आहे की, पुरूष अर्भक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                


Nagpur Crime News : जुगारातील कर्ज फेडण्यासाठी घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक; सहा जणांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त